Jump to content

चांपानेर

चांपानेर गुजरातमधील प्राचीन शहर आहे. वडोदरापासून ५० किलोमीटरवर असलेल्या या शहरात १५व्या शतकातली नगररचना दिसून येते. पावागढ टेकड्यांच्या पायथ्याशी हे नगर वसवले गेले आहे. पावागढ शिखरावर कालीमातेचे मंदिर आहे. वाटेत अनेक अलंकृत वास्तूंचे अवशेष आहेत. यांत कमानी, टाकी आणि तळी आहेत.

पावागढ हा मुळात हिंदू राजांनी निर्माण केलेला दुर्ग आहे. याच्याभोवती १६व्या शतकात मेहमूद बेगडा या सुलतानाने दुर्गाच्या परिसराचा उत्तम लाभ घेत सुंदर नगरी वसवली. मोगलांच्या आक्रमणानंतर हे शहर नष्ट झाले.