Jump to content

चांदा

चांदा तालुका - नेवासा या ठिकाणी गेल्या काही दशकांपासून नवीन देवस्थान उदयास आले आणि ते म्हणजे श्री दत्तधाम श्री दत्त साधकाश्रम चांदा. हे देवस्थान श्री क्षेत्र चांदा या ठिकाणी आहे . चांदा हे गाव पुणे-औरंगाबाद महामार्गावर घोडेगावपासून पूर्वेकडे ६ किमी तर शनी-शिंगणापूर पासून ११ किमी अंतरावर आहे . शनी शिंगणापूर कडे जाणाऱ्या मार्गाच्या विरुद्ध हे गाव आहे . हे गाव मोठे असून आर्थिक दृष्ट्या व आध्यात्मिक दृष्ट्या परिपूर्ण असे हे गाव आहे. या गावामध्ये पूर्वीपासूनच परमार्थ मोठ्या प्रमाणात घडतो आहे. अनेक थोर संत महापुरुषांचे वास्तव्य या गावात झाले आहे. जुन्या काळी जेव्हा मोगलांचे आक्रमण झाले तेव्हा शिवाजी महाराजसुद्धा या गावात आले होते. आणि आता तर या गावात परमार्थाची लाटच पसरली आहे. आणि ती लाट म्हणजे श्री दत्तधाम श्री दत्त साधाकाश्रम होय. दत्त साधकाश्रमाची सुरुवात श्री संत रोहिदास महाराज यांनी केली. त्यांनी त्यांच्या कठोर तपश्चर्येचे प्रतीक म्हणून हा आश्रम उभारला आहे. रोहिदास महाराज हे मूळचे शेवगाव तालुक्यातील वाघोली गावाचे. परंतु महाराजांचे बालपण चांदा गावामध्ये गेले. त्यांची तपश्चर्याही लहानपणापासूनच सुरू होती. त्यांच्या घराण्याला देखील ईश्वर भक्तीचे वेड होते. महाराजांचे वडील हे भगवान शंकराची भक्ती करत असत. महाराजांनी आळंदी व पंढरपूर या ठिकाणी वारकरी शिक्षण घेतल्यानंतर समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी, समाजाला ईश्वरभक्तीचा मार्ग दाखवण्यासाठी आणि आनंद संप्रदायाचा वारसा चालवण्यासाठी, श्री क्षेत्र चांदा या ठिकाणी थांबण्याचे व या ठिकाणाला आध्यात्मिक केंद्र बनवण्याचे ठरवले. आणि मग १९७१ साली नवीन दत्त मंदिराचे काम केले व त्यामध्ये भक्तिभावाने ओवाळून आणलेली दत्त मूर्तीची स्थापना केली. याच दत्त प्रभूंच्या प्रेरणेने महाराजांनी हजारो भक्तांचे जीवनच बदलून टाकले, अनेक व्यसनग्रस्तांना व्यसनमुक्त केले. व अनेकांना भगवंतप्राप्तीचा सोपा मार्ग दाखवला. महाराजांच्या सहवासामध्ये कसाही मनुष्य आला तर त्याच्यामध्ये आध्यात्मिक संचार झाल्याशिवाय राहत नाही.

सृष्टीच्या आरंभी श्री हंस भगवंताने जो उपदेश ब्रम्हदेवाला केला आणि मग ब्रम्हदेवाकडे सृष्टी स्थापन करण्याचे सामर्थ्य आले. तोच उपदेश गुरूपाराम्पारेने(!!!!) महाराजांकडे आलेला आहे . आणि अश्या प्रभावी मार्गाकडे अनेक भक्तांना महाराजांच्या आशीर्वादाने भगवंताचा अनुभव आलेला आहे आणि येत आहे.

दत्त साधकाश्रमाचाच परिसर निसर्गरम्य आहे. या परिसरामध्ये जर मन उद्विग्न झालेली व्यक्ती आली तर येथे प्रवेश केल्या केल्या मनामध्ये आनंदाचा संचार होतो . त्यामुळे एक पर्यटन स्थळ म्हणून भेट देण्यास हा परिसर मस्त आहे तसेच चांदा येथील सोमेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. याठिकाणचे मंदिर पुरातन वास्तु आहे. सोमेश्वर मंदिर स्वयंभू आहे असे मानले जाते. चांदा गावात प्राचीन पेठ आहे. तसेच गावातील मराठी शाळेपासून एक छोटी, सुंदर नदी वाहते.