Jump to content

चवदार तळे

चवदार तळे
तवदार तळ्याचे पाणी प्राषण करतानाचे बाबासाहेबांचे शिल्प

चवदार तळे हा महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील महाड शहरात असलेला एक ऐतिहासिक तलाव आहे. येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह इतिहासात प्रसिद्ध आहे. या सत्याग्रहाला महाडचा सत्याग्रह या नावानेही ओळखले जाते. तळ्याचे पाणी सर्वांसाठी खुले व्हावे व अस्पृश्यंनाही या पाण्याचा वापर करता यावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येथे सत्याग्रह केला. या लढ्याची आठवण तसेच ‘समतेचे प्रतीक’ म्हणून पर्यटक या तळ्याला भेट देतात. या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळाही उभारण्यात आला आहे.[]

चवदार तळे येथील सत्याग्रह

1925 मध्ये आंबेडकरांनी सार्वजनिक ठिकाणी पाण्याचा अधिकार वापरण्यासाठी सत्याग्रह (अहिंसक प्रतिकार) सुरू करण्याचा निर्णय घेतला.कोकणातील महाड या गावाला या कार्यक्रमासाठी निवडले गेले कारण तिथे हिंदू जातिय लोकांचा पाठिंबा होता. यामध्ये मराठी चंद्रसेनिया कायस्थ प्रभु (सीकेपी) समुदायाचे कार्यकर्ते ए.व्ही.छित्रे, समाजसेवा मंडळाचे चित्पावन ब्राह्मण आणि जी.एन. सहस्रबुद्धे, महाड नगरपालिकेचे अध्यक्ष असलेले सीकेपी सुरेंद्रनाथ टिपणीस यांचाही सामावेश होता.[]

महाड नगरपालिकेचे अध्यक्ष सुरेंद्रनाथ टिपणीस यांनी सार्वजनिक जागा अस्पृश्यांसाठी खुली असल्याचे जाहीर केले आणि इ.स. १९२७ मध्ये आंबेडकरांना महाड येथे बैठक घेण्याचे आमंत्रण दिले. बैठकीनंतर ते चवदार तळ्यावर गेले. आंबेडकरांनी तलावातील पाणी प्यायले आणि हजारो अस्पृश्य लोकांनी त्यांचे अनुसरण केले.[]

समाजातील काही उच्च वर्णिय लोकांनी 'अस्पृश्य लोकांनी तळ्यातील पाणी घेऊन तळे प्रदूषित कले' असे मत मांडले. त्यानंतर तळे शुद्ध करण्यासाठी गोमूत्र आणि शेण वापरले गेले, ब्राह्मणांनी मंत्र पठण केले. त्यानंतर तळे उच्च जातीच्या पिण्यासाठी योग्य असल्याचे घोषित केले.[]

आंबेडकरांनी २६-२७ डिसेंबर रोजी महाड येथे दुसरी परिषद घेण्याचे ठरविले. पण काही उच्च वर्णियांनी ते तळे खासगी मालमत्ता सांगुन आंबेडकरांवर गुन्हा दाखल केला. प्रकरण न्यायालयात असल्याने त्यांचा सत्याग्रह चालू ठेवता आला नाही.[]

२५ डिसेंबर रोजी (मनुस्मृती दहन दिन), आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोब्धे यांनी निषेध म्हणून मनुस्मृती या हिंदू कायद्याच्या पुस्तकाचा दहन केले. डिसेंबर १९३७ मध्ये, मुंबई उच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की अस्पृश्यांना तळयामधून पाणी वापरण्याचा अधिकार आहे.[]

प्रवास

महाडपर्यंत जाण्याकरिता एसटी बस उपलब्ध आहेत.

चित्रदालन

चवदार तळे

हे सुद्धा पहा

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची
  • महाड सत्याग्रह
  • भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, महाड

संदर्भ

  1. ^ http://prahaar.in/tag/%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A4%B3%E0%A5%87/
  2. ^ Omvedt, Gail (1994). Dalits and the Democratic Revolution: Dr Ambedkar and the Dalit Movement in Colonial India. SAGE Publications Pvt. Ltd. p. 138. ISBN 9788132119838.
  3. ^ Ranjit Kumar De, Uttara Shastree (1996). Religious Converts in India: Socio-political Study of Neo-Buddhists. Mittal Publications. p. 10. ISBN 978-81-7099-629-3.
  4. ^ Paik, Shailaja (2005). Dalit Women's Education in Modern India: Double Discrimination. Routledge. pp. 168, 169. ISBN 9781317673316.
  5. ^ Madan Gopal, Chitkara. Dr. Ambedkar and Social Justice. APH Publishing. p. 3. ISBN 978-81-7648-352-0.
  6. ^ Jadhav, K.N. Dr. Ambedkar and the Significance of His Movement. Popular Prakashan. p. 24. ISBN 978-81-7154-329-8.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत