Jump to content

चर दाबकलम

चर दाबकलम ही एक रोपाच्या दाब कलमाची पद्धत आहे. या पद्धतीत जमिनीच्या छोट्या चराच्या तळाशी रोपवाटिकेत एक वर्षाचे मातृवृक्ष ४५ ते ७५ सें.मी. अंतरावर ३० ते ४५ अंशाचा कोन करून तिरपे लावतात. हे चर १२० ते १५० सें मी. अंतरावरती असतात. नंतर चराच्या खंदकात मातृवृक्ष आडवे करून ५ सें.मी. खोलीवर दाबून टाकतात व त्यावर माती लोटतात. असे केल्यावर नवीन फांद्यांवर मुळया फुटून त्यावर नवीन खोडाच्या फांद्याही येतात. पहिल्या वर्षानंतर मातृवृक्ष छाटून टाकतात. मात्र एक वर्षानंतर ते मातृवृक्ष वाढू देतात. नंतर लाकडाचा भुसा वा इतर माध्यमे यांची भर टाकतात. मातृवृक्षाच्या आडव्या फांद्यापासून फुटलेले धुमाऱ्यांचे तळ झाकले जातील अशा रीतीने माध्यमांचे थर खंदकात टाकत जातात. पुढच्या ऋतूत धुमाऱ्यांभोवतालची माती काढण्यात येते. ज्या धुमाऱ्यांच्या तळाशी मुळया फुटलेल्या असतात, ते धुमारे वेगळे करतात.

हे सुद्धा पहा