Jump to content

चंद्रपूर जिल्हा

हा लेख चंद्रपूर जिल्ह्याविषयी आहे. चंद्रपूर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


चंद्रपूर जिल्हा
चांदा जिल्हा
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा
चंद्रपूर जिल्हा चे स्थान
चंद्रपूर जिल्हा चे स्थान
महाराष्ट्र मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यमहाराष्ट्र
विभागाचे नावनागपूर
मुख्यालयचंद्रपूर
तालुकेचंद्रपूर (तालुक्याचे ठिकाण) • पोंभुर्णा • चिमूर • वरोरा • ब्रम्हपूरी • राजुरा • मूल • सिंदेवाही • कोरपना • जिवती व •बल्लारपूर
क्षेत्रफळ
 - एकूण १०,००० चौरस किमी (३,९०० चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १०००००० (२०११)
-लोकसंख्या घनता३२२ प्रति चौरस किमी (८३० /चौ. मैल)
-साक्षरता दर८०.००
-लिंग गुणोत्तर१.०६ /
प्रशासन
-जिल्हाधिकारीविनय गौडा (भाप्रसे)
-लोकसभा मतदारसंघचंद्रपूर (लोकसभा मतदारसंघ), गडचिरोली (लोकसभा मतदारसंघ)(काही भाग)
-विधानसभा मतदारसंघ१.चिमूर विधानसभा मतदारसंघ २. राजुरा विधानसभा मतदारसंघ ३. ब्रम्हपूरी विधानसभा मतदारसंघ ४. वरोरा विधानसभा मतदारसंघ
-खासदारसुरेश धानोरकर
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान ९५४ मिलीमीटर (३७.६ इंच)
प्रमुख_शहरे बल्लारशा
संकेतस्थळ


चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागात आहे. पूर्वीचे चांदा १९६४ मध्ये अधिकृतरित्या चंद्रपूर झाले. चंद्रपूर ही गोंड राजांची राजधानी होती व नंतर १७ व्या शतकात नागपूरच्या भोसले मराठ्यांनी चंद्रपूर ताब्यात घेतले. इ.स.१९८१ला चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन नवा गडचिरोली जिल्हा अस्तित्वात आला. चंद्रपूर जिल्ह्याला काळ्या सोन्याची भूमी (Black Gold City) म्हणतात, कारण जिल्ह्यात अनेक कोळसा खाणी आहेत.

विदर्भाच्या नकाशात जिल्ह्याचे स्थान

स्थान

जिल्ह्याच्या उत्तरेस नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हावर्धा जिल्हा, पश्चिमेस यवतमाळ जिल्हा, पूर्वेस गडचिरोली जिल्हा, दक्षिणेस आदिलाबाद जिल्हा (आंध्र प्रदेश) आहे.हा जिल्हा वैनगंगावर्धा नदीच्या पात्रांदरम्यान वसला आहे, ह्या त्या जिल्ह्याच्या पूर्व व पश्चिम सीमा बनतात.

जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०,४९० किमी आहे तर लोकसंख्या २०,७१,१०१ इतकी आहे.

इतिहास

हवामान

तापमान किमान ७.१ ते कमाल ४७.२ से.च्या दरम्यान असते. पर्जन्यमान १३९८ मि. मी. इतके आहे. जिल्ह्याचे हवामान उष्ण असून मुख्यत: तीन ऋतु आहेत-उन्हाळा पावसाळा व हिवाळा. उन्हाळा मोठा व कडक असतो तर हिवाळा कमी कालावधीचा पण सौम्य असतो. मुख्य पीके तांदूळ (खरिप), कापूस, सोयाबीन, गहू, तूर, मूग, उडीद, मिरची ही आहेत.

समाजजीवन

बंगाली, तेलुगु सोबत सिंधी व पंजाबी समाज मोठ्या प्रमाणात आहे. मराठी भाषेबरोबरच गोंडी, कोलामी व हिंदी भाषादेखील प्रचलीत आहेत.

पर्यटनस्थळे

  1. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प अर्थात 'ताडोबा अंधारी व्याघ्र अभयारण्य व राष्ट्रीय उद्यान प्रकल्प'.
  2. आनंदवन
  3. घोडाझरी प्रकल्प
  4. दीक्षाभूमी, चंद्रपूर- येथे धम्मचक्र अनु-प्रवर्तन दिन साजरा करतात.

जिल्ह्यातील इतर पर्यटनस्थळे:-

  • सातबहिणी तपोवन (नागभीड),
  • अड्याळ टेकडी (ब्रम्हपुरी),
  • रामदेगी (चिमूर),
  • आसोला-मेंढा तलाव (सावली),
  • विजासन लेणी व
  • गवराळा गणपती (दोन्ही भद्रावती).

शैक्षणिक क्षेत्र

पूर्वीच्या नागपूर विद्यापीठ अंतर्गत येणारे शैक्षणिक परीसर आता गोंडवाना विद्यापीठत येते, तर चंद्रपुरात त्यांचे उपकेंद्र मंजूर असून भव्य इमारत बाबुपेठ परीसरात साकारत आहे.

नाथीबाई ठाकरसी महिला विद्यापीठचे कॅम्पस बल्लारपूरात सुरू होत आहे.

विशेष संस्था/महाविद्यालये

= वनराजिक महाविद्यालय चंद्रमा

चंद्रमा :

चंद्रपुरात वन अकादमी आहे. याचे अधिकृत नांव चंद्रपूर वनविकास, व्यवस्थापन व संशोधन प्रबोधिनी असे आहे, तर संक्षिप्तरूपात यालाच चंद्रमा असे म्हणले जाते. या संस्थेत RFO अर्थात वनक्षेत्रपाल (वन परिक्षेत्र अधिकारी) यांचे प्रशिक्षण होते. ही संस्था मुल रोडवर आहे.

लष्करी शिक्षण संस्था

शहराच्या दक्षिणेकडील टोकाला विसापूरनजिक नवीन सुरू झालेले सैनिक विद्यालय उभारण्यात आले आहे. ही संस्था केंद्र शासनाच्या अधिनस्थ कार्य करते.

उद्योगधंदे

महत्त्वाचे उद्योग- जिल्ह्यात बल्लारशहा कागद उद्योग, कोळसा खाणी, महाराष्ट्र राज्य औष्णिक विद्युतनिर्मिती व सिमेंट (अल्ट्राटेक, अंबुजा, माणिकगड व ए.सी.सी) हे महत्त्वाचे उद्योग आहेत.

चंद्रपूरात अनेक चुन्याच्या खाणीदेखील आहेत.

  1. भद्रावती स्थित शस्त्रास्त्र कारखाना
  2. फेरोअॅलॉय कारखाना

जिल्ह्यातील तालुके

  • चंद्रपूर,
  • वरोरा,
  • भद्रावती,
  • चिमुर,
  • नागभीड,
  • ब्रम्हपूरी,
  • सिंदेवाही,
  • मूल,
  • गोंडपिंपरी,
  • पोंभुर्णा,
  • सावली,
  • राजुरा,
  • कोरपना,
  • जिवती
  • बल्लारपूर

राजकारण

  1. मारोतराव कन्नमवार, महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री
  2. शांताराम पोटदुखे, मनमोहनसिंग यांचेसोबत अर्थराज्यमंत्री- राज्यसभेत १९९१चा प्रसिद्ध खा-ऊ-जा अर्थसंकल्प सादर केलेला
  3. हंसराज अहिर, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगचे अध्यक्ष
  4. विजय वडेट्टीवार, राज्याचे विरोधीपक्षनेते

महिला राजकारणी

  1. शोभा फडणवीस, कॅबिनेटमंत्री
  2. गोपिकाताई कन्नमवार, चंद्रपूरच्या खासदार
  3. यशोधरा बजाज, माजी राज्यमंत्री
  4. प्रतिभा धानोरकर, वरोऱ्याच्या आमदार

समाजकारण

  1. बाबा आमटेंचा आनंदवन आश्रम याच जिल्ह्यात आहे.
  • पारोमिता गोस्वामी

संदर्भ

बाह्य दुवे

चंद्रपूर एन.आय.सी