चंद्रकांत भोंजाळ
चद्रकांत भोंजाळ (जन्म : ११ जानेवारी १९५४) हे एक मराठी लेखक आणि अनुवादक आहेत. त्यांनी अनेक हिंदी-इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवाद केले आहेत.
पुस्तके
- दि अॅक्ट ऑफ लाइफ (अनुवादित आत्मकथन, व्यक्तिचित्रण. मूळ लेखक - अमरीश पुरी, ज्योती सभरवाल)
- अथांग रहस्य : जीवन तुमच्याकडून काय अपेक्षा करतं? (आध्यात्मिक, अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - एनमैरी पोस्टमा)
- अमृतानुभव (तीन लघु कादंबऱ्या)
- आकाशवाणी आणि दूरदर्शन (मुलांसाठी माहितीपर बालसाहित्य)
- आख्यान (सदर लेखन संग्रह)
- आग अजून बाकी आहे (अनुवादित कथासंग्रह, मूळ लेखिका - चित्रा मुद्गल)
- उत्तरायण (कथासंग्रह; मराठी अनुवाद, मूळ हिंदी लेखक - दामोदर खडसे)
- उंदीर आणि मणूस
- एक होती राधा (अनुवादित, मूळ उर्दू लेखख - सआदत हसन मंटो)
- कफन (अनुवादित)
- काही जनातलं काही मनातलं (लेखसंग्रह)
- कोलाहल (अनुवादित मराठी कादंबरी; मूळ हिंदी लेखक - दामोदर खडसे)
- खंडित सूर्य (अनुवादित मराठी कादंबरी; मूळ हिंदी लेखक - दामोदर खडसे)
- गप्पा सिनेमाच्या (अनुवादित, मूळ हिंदी लेखक - जावेद अख्तर, नसरीन मुन्नी कबीर)
- चालत दुरूनी आलों मागें ..(अनुवादित आत्मकथन, व्यक्तिचित्रण. मूळ हिंदी लेखक - राजेंद्र यादव)
- तप्त प्रवाह (निवडक भारत सासणे, अनुवादित कथासंग्रह, मूळ लेखक - भारत सासणे)
- तिसरा श्वास (अनुवादित, मूळ हिंदी कथा-लेखक कामतानाथ)
- त्यांचं आपलं सेम नसतं (अनुवादित, मूळ लेखिका - पुष्पा भारती)
- त्रिशंकू (अनुवादित मराठी कथासंग्रह; मूळ लेखक - मन्नू भंडारी)
- दि ॲक्ट ऑफ लाईफ (मराठी अनुवाद, मूळ इंग्रजी लेखक - अमरीश पुरी व ज्योती सभरवाल)
- धूळपेरणी (सदर लेखन संग्रह)
- नमन (लेखसंग्रह)
- नरक मसीहा (अनुवादित हिंदी कादंबरी, मूळ हिंदी लेखक - भगवानदास मोरवाल)
- निलू, नीलिमा, निलोफर
- बिछड़े सभी बारी बारी (मराठी अनुवाद, मूळ हिंदी लेखक - बिमल मित्र)
- ब्रेकिंग न्यूझ (संपादित - अजीत अंजुम, राजेंद्र यादव, रविंद्र त्रिपाठी)
- भय इथले संपत नाही : फाळणी एक दुःस्वप्न (अनुवादित कथासंग्रह, मूळ लेखक - अनेक)
- मंटो हाजीर हो (विख्यात उर्दू लेखक सआदत हसन मंटो याच्यावर भरलेल्या पाच खटल्यांची कहाणी आणि त्या कथा, मराठी अनुवाद, मूळ लेखक - मंटो)
- मैथिलीची गोष्ट (अनुवादित कथासंग्रह; मूळ हिंदी लेखिका - सुधा अरोडा)
- लाल श्याम शहा : एका आदिवासीची जीवनकथा (अनुवादित कादंबरी, मूळ लेखक - सुदीप ठाकूर)
- लोकशाहीची ऐशी तैशी (अनुवादित कादंबरी, मूळ हिंदी लेखक - विभूती नारायण राय)
- वासकसज्जा
- श्वास घेणारं आकाश
- सत्य (अनुवादित मराठी कथासंग्रह, मूळ हिंदी- 'यही सच है' लेखक - मन्नू भंडारी)
- साक्षीदार (अनुवादित कादंबरी, मूळ हिंदी लेखक - जितेंद्र भाटिया)
- सौदामिनी (अनुवादित मराठी कादंबरी; मूळ 'स्वामी' लेखक - मन्नू भंडारी)