घोर नृत्य उत्सव
घोर नृत्य उत्सव हा सांस्कृतिक ठेवा घोलवड गावाची ओळख आहे. येथील माच्छी, भंडारी, बारी समाजातील लोक हा उत्सव साजरा करतात. घोर हे वाद्य लोखंडी सळईच्या गोल रिंगणात घुंगरू गुंफून केलेले वाद्य आहे. हे वाद्य हाताच्या मुठीत घेऊन लयबद्ध वाजविले जाते. वाद्याच्या तालावर नाच केला जातो. दरवर्षी दिवाळीच्या दिवसांत धनत्रयोदशी पासून सुरुवात करून नरकचतुर्दशी,लक्ष्मीपूजन, आणि बलिप्रतिपदेपर्यंत हे नृत्य केले जाते. हा पुरुषप्रधान नाच आहे. १२ ते १५ पुरुषांच्या जोड्या घोर वाद्याच्या तालावर दोन ते तीन प्रकारचा फेर धरून नृत्य सादर करतात. हा नाच समाजबांधवांच्या अंगणात, मंदिरात, ग्रामदैवत असलेल्या ठिकाणी केला जातो. हे नृत्य सरस्वती देवी मातेला प्रसन्न करण्यासाठी करतात.[१]
- ^ महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, शनिवार दिनांक २३ मार्च २०२४