घोडाझरी प्रकल्प
घोडाझरी हा प्रकल्प जवळपासचे ७ तलाव एकत्रित करून तयार झालेला आहे. नैसर्गिक सौंदर्याने नटलेला हा परिसर फारच रम्य आहे. नागभीडच्या शिवटेकडीच्या पाठीमागील परीसर अत्यंत रम्य आहेे. ऑगस्ट ते ऑक्टोबर या महिन्यादरम्यान तलावाला भर असतो, त्यावेळेस सलंगचे (ओसंडून वाहणारा) धबधब्यातील सौंदर्य अतीविलोभनीय असते. तर त्या पाण्यात स्वच्छंद आनंद घेण्याचा अनुभव हा सर्वांसाठी अर्विस्मरणीय असाच असतो.
- क्षेत्र: १५९.५८३ चौ.किमी
येथे बोटींगची व्यवस्था आहे.
कसे पोहचाल: नागभीड वरून दक्षिण- पश्चिमेला चंद्रपूर मार्गावर ७ कि.मी. अंतरावर. नागभिड हे तालूका ठिकाण नागपूरवरून ९५ कि.मी., चंद्रपूर वरून १०५ कि.मी. तर गडचिरोलीवरून ८० कि.मी. आहे.
सावधानत: परिसरात एकट्याने जाऊ नये वन्य प्राणी आहेत.