Jump to content

घोडबंदर रस्ता

घोडबंदर रस्ता

राज्य महामार्ग ४२ किंवा घोडबंदर रस्ता हा महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यामधील एक प्रमुख व वर्दळीचा रस्ता आहे. २० किमी लांबीचा हा रस्ता मुंबई महानगर क्षेत्रामधील एक महत्त्वाचा दुवा आहे. ठाणे शहरामध्ये कापूरबावडी जंक्शनपाशी पूर्व द्रुतगती महामार्गापासून घोडबंदर रस्त्याची सुरुवात होते. तेथून साधारण उत्तर व पश्चिम दिशेस धावून हा रस्ता घोडबंदरापाशी पश्चिम द्रुतगती महामार्गाला मिळतो.