Jump to content

घोटाळा

स्वतःच्या फायद्यासाठी आणि / किंवा इतरांच्या नुकसानीसाठी मुद्दाम केलेली फसवणूक म्हणजे घोटाळा. हा एक गुन्हा आहे. भारतात अनेक प्रकारचे घोटाळे व भ्रष्टाचार होत आलेले आहेत.

तोटे

प्रकार

प्रतिबंध

भारतातील घोटाळे

सत्यम घोटाळा (२००९)

सत्यम हा भारतातला मोठा घोटाळा मान्ला जातो. सात जानेवारी २००९ रोजी सत्यमचे तत्कालीन चेयरमन रामलिंग राजू यांनी राजीनामा पात्र संचालक मंडळाकडे सादर करीत असताना त्यांनी केलेल्या ७००० कोटी रुपयांच्या घोटाळ्याची कबुली दिली. फेब्रुवारी २००९ मध्ये या घोटाळ्याचा तपास सीबीआय कडे सोपवण्यात आला होता. या घोटाळ्याचे अन्वेषण करण्यात पुण्यातील न्यायवैद्यक लेखापरीक्षक मयूर जोशी यांचा मोठा सहभाग होता.मुख्यत्वे हा घोटाळा अर्थपत्रकांमध्ये केला गेलेला घोटाळा होता. शेयर बाजारात सत्यमच्या समभागांचे मूल्य वाढवण्यासाठी पहिले विक्री वाढवली गेली, मग वाढलेले नफ्याचे आकडे खोट्या बँक स्टेटमेंट व फिक्स डीपाॅझिट रिसिट्सद्वारे लेखापरिक्षकांसमोर मांडण्यात आले. प्राईस वाॅटर हाऊस या लेखापरिक्षण संस्थेने कोणतीही शहानिशा न करता ते योग्य असल्याचा निर्वाळा दिला.वित्तपत्रकातील फेरफार झालेली ही पहिलीच घटना असल्याने सीबीआयने मल्टी डिसीप्लीनरी इन्वेस्टिगेशन टीम बनवली ज्याचे नेतृत्व तत्कालिन डीआयजी लक्ष्मीनारायणा यांनी केलेलं आणि ९० दिवसाच्या आत चार्जशीट पण फाईल केलेली. एका सभेत बोलताना त्यांनी या यशाचे बरचसं श्रेय मयूर जोशी यांना दिलेलं.

आदर्श घोटाळा (२०१०)

आदर्श हौसिंग सोसायटी ही भारतातल्या संरक्षण कर्मचाऱ्यांच्या विधवांना आश्रय देण्यासाठी मुंबईतील कुलाबा भागातील सोसायटी होती, ज्यात अनेक राजकारण्यांचे हितसंबंध गुंतलेले. अनेक नियम धाब्यावर बसवून राजकीय मंडळींनी या सोसायटी मध्ये स्वस्तात घर पदरात पडून घेतली होती

शारदा चिट फंड (२०१३)

पूर्व भारतात घडलेली  पॉन्झी प्रकारात मोडणारी घोटाळ्याची घटना, यात शारदा समूहाने २०० पेक्षा अधिक कंपन्या तयार करून २०००० कोटी रुपये जमा केल्याचे आरोप या कंपनीवर होते. या घोटाळ्यात अनेक राजकारणी नेत्यांचा देखील सहभाग असल्याचे आता पुढे येत आहे.