घेतला वसा टाकू नको |
---|
सूत्रधार | * पंडित अतुलशास्त्री भगरे गुरूजी |
---|
देश | भारत |
---|
भाषा | मराठी |
---|
एपिसोड संख्या | २४६ |
---|
निर्मिती माहिती |
---|
प्रसारणाची वेळ | सोमवार ते शनिवार संध्या. ६.३० वाजता |
---|
प्रसारण माहिती |
---|
वाहिनी | झी मराठी |
---|
पहिला भाग | ८ मार्च २०२१ – २४ एप्रिल २०२१ |
---|
प्रथम प्रसारण | १६ ऑगस्ट २०२१ – ९ एप्रिल २०२२ |
---|
अधिक माहिती |
---|
आधी | होम मिनिस्टर |
---|
नंतर | मन झालं बाजिंद |
---|
घेतला वसा टाकू नको ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली एक पौराणिक मालिका आहे.
कथा
एपिसोड | प्रसारण | उत्सव | नाव |
---|
१-४ | ८-११ मार्च २०२१ | महाशिवरात्री | चंद्रभानाची कथा |
५-७ | १२-१६ मार्च २०२१ | खुलभर दूधाची कथा |
९-१७ | १७-२६ मार्च २०२१ | भानुसप्तमी | सौभाग्याच्या व्रताची कथा |
१८-२७ | २७ मार्च-७ एप्रिल २०२१ | होळी | भक्त प्रल्हादाची कथा |
२८-३७ | ८-१८ एप्रिल २०२१ | गुढीपाडवा | पार्थिव लिंगार्चन व्रताची कथा |
३८-४३ | १९-२४ एप्रिल २०२१ | रामनवमी | श्रीराम जन्माची कथा |
४४-४८ | १६-२० ऑगस्ट २०२१ | सत्यनारायण पूजा | नारायणाची कथा |
४९-५१ | २१-२४ ऑगस्ट २०२१ | श्रावण | शतानंदाची कथा |
५२-५७ | २५-३१ ऑगस्ट २०२१ | साधू वाणीची कथा |
५८-६५ | १-९ सप्टेंबर २०२१ | मंगळागौर | अनुसूयाची कथा |
६६-६९ | १०-१४ सप्टेंबर २०२१ | गणेशोत्सव | गणेशाची कथा |
७०-७३ | १५-१८ सप्टेंबर २०२१ | प्रियाव्रताची कथा |
७४-७६ | २०-२२ सप्टेंबर २०२१ | पितृपक्ष | कर्णाची कथा |
७७-८५ | २३ सप्टेंबर-२ ऑक्टोबर २०२१ | गंगा आणि भगीरथाची कथा |
८६-९० | ४-७ ऑक्टोबर २०२१ | नवरात्र | महिषासुराची कथा |
९१-९७ | ८-१६ ऑक्टोबर २०२१ | शुंभ-निशुंभाची कथा |
९८-१०४ | १८-२५ ऑक्टोबर २०२१ | शनिदेव | शनिदेवांची कथा |
१०५-११० | २६ ऑक्टोबर-२ नोव्हेंबर २०२१ | विक्रमादित्याची कथा |
१११-११३ | ३-५ नोव्हेंबर २०२१ | दिवाळी | दिव्यांची कथा |
११४-११७ | ६-१० नोव्हेंबर २०२१ | नरकासुराची कथा |
११८-१२२ | ११-१६ नोव्हेंबर २०२१ | तुलसी विवाह | वृंदाची कथा |
१२३-१३० | १७-२५ नोव्हेंबर २०२१ | जिवंतिका | जिवतीची कथा |
१३१-१३८ | २६ नोव्हेंबर-४ डिसेंबर २०२१ | ललिता पंचमी | सुकीर्तची कथा |
१३९-१४७ | ६-१५ डिसेंबर २०२१ | मार्गशीर्ष गुरुवार | महालक्ष्मी व्रताची कथा |
१४८-१५३ | १६-२२ डिसेंबर २०२१ | शिळा सप्तमी | पद्मकुमारची कथा |
१५४-१६० | २३-३० डिसेंबर २०२१ | पिठोरी अमावस्या | अवनीची कथा |
१६१-१७२ | ३१ डिसेंबर २०२१-१३ जानेवारी २०२२ | आदित्यनारायण व्रत | वनिता आणि सरिताची कथा |
१७३-१८८ | १४ जानेवारी-१ फेब्रुवारी २०२२ | सोळा सोमवार व्रत | देवव्रताची कथा |
१८९-२०२ | २-१७ फेब्रुवारी २०२२ | शुक्रवार उपवास | देवदत्ताची कथा |
२०३-२०९ | १८-२५ फेब्रुवारी २०२२ | सोमवारचे महत्त्व | कल्पवसूची कथा |
२१०-२२२ | २६ फेब्रुवारी-१२ मार्च २०२२ | संपत शनिवार व्रत | बल्लाळची कथा |
२२३-२३० | १४-२२ मार्च २०२२ | सोमवती अमावास्या उपवास | गुणवतीची कथा |
२३१-२३९ | २३ मार्च-१ एप्रिल २०२२ | बुध-बृहस्पती व्रत | वरुणिकाची कथा |
२४०-२४६ | २-९ एप्रिल २०२२ | गाथा सप्तशती | विजयानंदाची कथा |
विशेष भाग
- वसा व्रत-वैकल्यांचा, मराठी संस्कृती आणि परंपरेचा, पाहूया व्रत-वैकल्यामागे दडलेली कहाणी. (८ मार्च २०२१)
- महाशिवरात्रीला शिकारीसाठी सज्ज चंद्रभान कसा ठरला महादेवांचा परमभक्त? (१० मार्च २०२१)
- कसं लाभलं व्याध चंद्रभानाला आकाशगंगेतलं अढळपद? महादेवाच्या परम भक्ताची कहाणी. (१२ मार्च २०२१)
- ममता आणि भक्तीच्या परीक्षेत माईआजी सफल होणार का? भक्ताच्या हाकेला शंभू महादेव धावून येणार का? (१५ मार्च २०२१)
- इंदुमती घेणार सौभाग्याच्या व्रताचा वसा, पण महाराणी कांचनमालेच्या असूयेमुळे होईल का व्रत पूर्ण? (१७ मार्च २०२१)
- प्रतिशोध, ममता आणि परमभक्तीची कहाणी, होळीनिमित्त कथा भक्त प्रल्हादाची. (२७ मार्च २०२१)
- श्रीविष्णूंना शत्रू मानणाऱ्या हिरण्यकश्यपूच्या घरीच जन्म घेणार त्यांचा परमभक्त प्रल्हाद. (२९ मार्च २०२१)
- असं काय घडलं होतं गुढीपाडव्याला जेणेकरून महादेवांचा माता पार्वतीसोबत लग्नाचा नकार होकारात बदलला? (८ एप्रिल २०२१)
- माता पार्वतीच्या व्रतात स्वतः महादेवच का आणत होते विघ्न? (१२ एप्रिल २०२१)
- वाजत गाजत निघाली महादेवांची वरात, पण देवी मैनावती देणार का शिव-पार्वती विवाहास संमती? (१४ एप्रिल २०२१)
- शिव-पार्वती विवाह सोहळा गुढीपाडव्यानिमित्त पार्थिव लिंगार्चन व्रताची कथा. (१८ एप्रिल २०२१)
- नशिबी पुत्रयोग नसूनही राजा दशरथ आणि कौसल्येला कशी झाली पुत्रप्राप्ती? श्रीविष्णूंचा मानव अवतार श्रीराम जन्माची कथा. (२१ एप्रिल २०२१)
- चैत्रमास त्यात शुद्ध नवमी तिथी, राम जन्मला गं सखी राम जन्मला. (२४ एप्रिल २०२१)
- मराठी संस्कृती आणि व्रतवैकल्यांची गाथा.
(१६ ऑगस्ट २०२१) - शनिदेवांचा प्रकोप कसा टाळावा? मनुष्याच्या कर्माचा न्यायनिवाडा करणाऱ्या शनिदेवांची जन्मकथा. (१८ ऑक्टोबर २०२१)
- शनिदेव आणि पिता सूर्यदेवांमध्ये समेट घडवणार महाबली हनुमान.
(२१ ऑक्टोबर २०२१) - शनिदेवांच्या प्रकोपाने राजा विक्रमादित्याच्या आयुष्यात येणार वादळ, शनिमाहात्म्य कथा सप्ताह.
(२६ ऑक्टोबर २०२१) - ऐका सांगतो महाराजा कहाणी दिव्यांची, दीपावली विशेष कथा. (३ नोव्हेंबर २०२१)
- सोळा सहस्र नारींच्या उद्धारासाठी श्रीहरींनी केला नरकासुराचा अंत.
(८ नोव्हेंबर २०२१) - दीपावलीनिमित्त तुलसी विवाह कथा.
(११ नोव्हेंबर २०२१) - वृंदावर कशी झाली श्रीविष्णूंची कृपा?
(१५ नोव्हेंबर २०२१) - मातृत्वाची महती जिवती मातेच्या कथेतून.
(१७ नोव्हेंबर २०२१) - जिवती मातेच्या कृपेने अखेर घडणार साहुरी आणि तिच्या पुत्राची भेट.
(२२ नोव्हेंबर २०२१) - भक्तिमार्गातूनच मिळतो सुखाचा ठेवा, ललिता पंचमीची कथा.
(२६ नोव्हेंबर २०२१) - ललिता देवीच्या व्रताचा वसा टाकल्याने काय घडणार सुकीर्तच्या भाग्यात?
(१ डिसेंबर २०२१) - देवी लक्ष्मी सांगणार सुख-समृद्धी आणि धनसंपन्नतेचा मार्ग, मार्गशीर्ष महिन्यातल्या महालक्ष्मी व्रताची कथा.
(६ डिसेंबर २०२१) - पोटच्या मुलांच्या मृत्यूच्या दुष्टचक्रातून बाहेर पडेल का अवनी?
(२७ डिसेंबर २०२१) - वसा घेऊन सरिताने केली त्याची हेळसांड, जीवनात पसरलेल्या काळोखात कसा येईल दिव्यप्रकाश?
(३० डिसेंबर २०२१)
बाह्य दुवे