घाटंजी
घाटंजी हे शहर यवतमाळ जिल्हातील एक फार जुने शहर तसेच तालुका मुख्यालय आहे.
येथील शेतकरी उच्चकोटीच्या कापसाची शेती करतात, म्हणून हे शहर “Cotton City” या नावाने सुद्धा ओळखले जाते.
घाटंजी तालुका (घाट+अंजी) | |
---|---|
महाराष्ट्र राज्याच्या यवतमाळ जिल्हा जिल्ह्याच्या नकाशावरील घाटंजी तालुका दर्शविणारे स्थान | |
राज्य | महाराष्ट्र, भारत |
जिल्हा | यवतमाळ जिल्हा |
जिल्हा उप-विभाग | केळापूर उपविभाग |
मुख्यालय | घाटंजी |
क्षेत्रफळ | ९६९ कि.मी.² |
लोकसंख्या | १,२५,१६७ (२००१) |
लोकसंख्या घनता | १२९/किमी² |
साक्षरता दर | ७७०५६ |
तहसीलदार | पूजा मातोडे |
लोकसभा मतदारसंघ | चंद्रपूर |
विधानसभा मतदारसंघ | आर्णी(अ.ज.) |
आमदार | डॉ. संदीप प्रभाकर धुर्वे |
पर्जन्यमान | ११००.५ मिमी |
[yavatmal.nic.in/mGis_gha.htm कार्यालयीन संकेतस्थळ] |
घाटंजी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्याचा एक तालुका आहे.
नावाची व्युत्पत्ती
घाटंजी हे शहर “घाटी” व “अंजी” या दोन्ही गावाच्या मध्य स्थित असल्यामुळे या शहराचे नाव घाटंजी असे पडले आहे.
घाटंजी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्याचा एक तालुका आहे.
धार्मिक
या शहराला लागुनच असलेल्या अंजी येथे ऐतिहासिक हेमाडपंथी शैलीतील अत्यंत प्राचीन व भव्य श्री नृसिंहचे पाषाण कलाकृती असलेले मंदिर आहे. महाराष्ट्रातूनच नाही तर आंध्रप्रदेशातूनही लाखो भाविक येथे भगवान नृसिंहाच्या दर्शनासाठी येतात.
- घाटंजी शहराच्या मध्यवस्तीत सुमारे १५० वर्षांपेक्षाही जुने असलेले अंबादेवीचे जागृत देवस्थान आहे. नवरात्र उत्सवात येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते.
- तसेच संत गजानन महाराजांचे मंदिरही प्रसिद्ध आहे. प्रकटदिनाच्या दिवशी येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. एरवीही येथे भाविकांची मांदियाळी असते.
येथे वाघाडी नदीच्या काठावर असलेले ब्रम्हलीन संत श्री. मारोती महाराज यांचे देवस्थान आहे. दरवर्षी जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात येथील आझाद मैदानावर ब्रम्हलीन संत श्री. मारोती महाराज यांच्या नावाने फार मोठ्या यात्रेचे आयोजन करण्यात येते.
गुरे बाजार
यादरम्यान येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून भव्य गुरांच्या बाजाराचे आयोजन देखील करण्यात येते. महाराष्ट्र राज्यासह देशातील विविध ठिकाणांहून येथे गुरांची विक्री व खरेदी करण्यासाठी अनेक लोक येतात. हा विदर्भातील नावाजलेला गुरांचा बाजार आहे.
शैक्षणिक
घाटंजी या गावात मराठी व उर्दू भाषेतून नगरपालिका प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा आहेत, तसेच
- श्री समर्थ हायस्कूल व सायन्स ज्यु. कॉलेज,
- एस. पी. एम. कन्या हायस्कूल,
- एस. पी. एम. मुलांचे हायस्कूल,
- एस. पी. एम. सायन्स व गिलानी आर्ट, कॉमर्स कॉलेज ही विद्यामंदिरे प्रामुख्याने आहेत.
- लगतच्या बेलोरा या गावात जवाहर नवोदय विद्यालय हे आहे.
माहिती संकलन- भारत सुविधा (www.BharatSuvidha.com)