घनवर (पक्षी)
घनवर, अहेरी किंवा राखी बदक (इंग्लिश: Spotbill Duck; हिंदी: गुगरल,लाद्दीम,बरमुघी हंस) हा एक पक्षी आहे.
घनवर हा आकाराने बदकाएवढा असतो परंतु चणीने मोठा असतो. याच्या पिसांवर खवल्या-खवल्यांसारखी पिवळट व गडद उदी रंगाची चिन्हे असतात.पंखाची बाजू पांढऱ्या व तकाकीत हिरव्या रंगाच्या दुरंगी पत्त्याने उठून दिसते.त्याचे पाय नारंगी-तांबडे रंगाचे असतात.चोचीच्या बुडाशी कपाळाच्या दोन्ही बाजूंना दोन रंगाचे ठिपके अस्रतात.यावरून त्याची ओळख निश्चित पटते.नर-मादी दिसायला सारखेच असतात.घनवर भारत दक्षिणेकडे कर्नाटक आणि काश्मीर या भागात निवासी असतात.हे पक्षी भटके आणि स्थानिक स्थलांतर करतात.घनवर हा श्रीलंकेत हिवाळ्यात पाहायला मिळतो.अंदमान येथे एकदाच आढळून येतो.घनवर हा प्रामुख्याने झिलानी,नद्या आणि सरोवरे येथे आढळतो.
संदर्भ
- पक्षीकोश - मारुती चितमपल्ली