घटसर्प (पशुरोग)
घटसर्प हा जनावरांना/प्राण्यांना,तसेच विशेषतः दुधाळू जनावरांना होणारा एक प्रकारचा रोग आहे.विशेषतः म्हशींमध्ये हा रोग जास्त प्रमाणात आढळतो.हा रोग 'पाश्चुरेला मल्टोसिडा' या विषाणूंमुळे होतो.
इतर नावे
या रोगास महाराष्ट्रातील ग्रामीण भागात गळसुजी,परपड,घटसर्प या नावाने ओळखल्या जाते.
लागण
या रोगाचे जंतू जमिनीत, जनावराच्या नाकपुड्यात व श्वासनलीकेत असतात. रोगी जनावराचे नाकातोंडातून वाहणाऱ्या स्त्रावामुळे व दूषित चाऱ्याद्वारे हा रोग पसरतो.
लक्षणे
या रोगामुळे जनावरास फार ताप येतो.घशास सूज येते.श्वासोच्छवास जलद रितीने होतो.जनावराचे डोळे लाल होतात.ते सतत वाहतात. जीभ बाहेर येते. नाकातून शेंबडासारखा स्त्राव बाहेर पडतो व लाळ वाहते. कोणत्या कोणत्या जनावरांना काही वेळेस रक्ताची हागवण होते व अंगावर सूज येते.
औषधोपचार
पशुवैद्यक डॉक्टरांचे सल्ल्याने प्रतिजैविकांची इंजेक्शने, सल्फाDimedian
प्रतिबंधक उपाय
मे महिन्यात गुरांना प्रतिबंधक लस टोचून घ्यावी