Jump to content

ग्लायसेटेड हिमोग्लोबिन

ग्लायसेटेड हिमोग्लोबिन हे रक्तामधील ग्लुकोजचे मागील काही आठवड्यातील ( ३ महिन्यां पर्यंत ) प्रमाण दर्शवते. ग्लायसेटेड हिमोग्लोबिनची निर्मिती एनझायमॅटिक नसलेल्या साखरेच्या रेणूंचे रक्तातील प्लाझ्मा ग्लुकोजशी संयोग झाल्या वर होते. या ग्लायसेटेड हिमोग्लोबिनचे प्रमाण रक्तातील साखरेच्या प्रमाणावर अवलंबून असते. याचे रक्तातील प्रमाण हे मागील ३ महिन्यांपर्यंतची सरासरी असते कारण लाल रक्त पेशींचे आयुष्य साधारण ३ महिने असते.

मधुमेहा मधे ग्लायसेटेड हिमोग्लोबिनचे जास्त प्रमाण रक्तातील साखरेचे नियंत्रण नसणे दर्शवते. याचा सबंध शरीरातील रक्ताभिसरण प्रणाली, मुत्रप्रणाली आणि दृष्टी प्रणालीशी असतो. ग्लायसेटेड हिमोग्लोबिनची रक्तातील मात्रा ही मधुमेहाच्या तपासणी साठी वापरतात.

इतिहास

हिमोग्लोबिन A1c हे इतर हिमोग्लोबिन पासून पृथक करण्याचे काम प्रथम १९५८ मधे हुईसमन आणि मेयरिंग यांनी क्रोमॅटोग्राफीक कॉलम वापरून केले. याचे ग्लायकोप्रोटिन असे वर्गीकरण १९६८ मधे बुकचिन आणि गॅलोप यांनी केले. याचे मधुमेहा मधे प्रमाण वाढते हे प्रथम १९६९ मधे सॅम्यअल राह्बार यांनी नोंदवले. ग्लायसेटेड हिमोग्लोबिनच्या र्निमिती मुळे होणारी प्रक्रियांचे वर्गीकरण हे बन आणि त्यांच्या सहकारी वर्गाने १९७५ मधे केले. याचा उपयोग रक्तातील साखरेचे प्रमाण मोजण्यासाठी वापरावे असे ऍनथोनी सेरामी, रोनाल्ड कोएनिंग आणि सहकारी वर्ग यांनी १९७६ मधे सुचवले.

माहिती

प्रथिने ग्लायसेशन ही एक वारंवार घटना आहे, पण हिमोग्लोबिन बाबतीत, एक एन्झायमॅटिक नसलेल्या रासायनिक प्रतिक्रिया ग्लुकोजच्या आणि बीटा साखळी एन-एंड मधे होतात. हे स्वतः १-डिऑक्सीफ्रक्टोज रूपांतरित आहे जे एक श्चिफ बेस फॉर्म . ही पुर्नरचना, अमाडोरी पुर्नरचनेचे एक उदाहरण आहे .

जेव्हा रक्तातील ग्लुकोजची पातळी जास्त होते तेंव्हा ग्लुकोजचे रेणू लाल पेशी मधील हिमोग्लोबीनला चिकटतात, जर ग्लुकोजची पातळी जास्त राहिली तर ग्लुकोज चिटकायाचे प्रमाण वाढत जाते. हे चिकटलेल्या ग्लुकोजचे रेणू लाल पेशीत तसेच राहतात. यामुळे HbA1cचे रक्तातील प्रमाण रक्तातील शर्करेच्या चार आठवडे ते तीन महिन्याच्या कालावधीत समः प्रमाणात असते. काही शास्त्रद्न्यांच्या नुसार, हे प्रमाण तीन ते चार आठवड्या मधे जास्ती सम प्रमाणात असते. या माहितीची योग्यता २० दिवसांच्या पर्यंत तीव्र कमी होणाय्रा HbA1c निदाना मुळे सिद्ध होते.

HbA1cची मोजणी पद्धती

खालील काही पद्धतींनी HbA1cची मोजणी करतात.

प्रयोगशाळे मधे

  • हाय पर्फोर्मन्स लिक्वीड क्रोमॅटोग्राफी (HPLC): HbA1c आणि हिमोग्लोबिनचे प्रमाण काढून माहिती मिळते
  • इम्युनोअसेय्
  • इन्झायमॅटिक
  • कॅपिलरी इलेक्ट्रोफोरेसीस
  • बोरोनेट अफिनिटी क्रोमॅटोग्राफी

दवाखान्यांमधे

  • इम्युनोअसेय्
  • बोरोनेट अफिनिटी क्रोमॅटोग्राफी

अमेरिकेमधे HbA1c १९९३ च्या डायबेटिस कंट्रोल ऍड कॉम्प्लीकेशन खटल्या नुसार तपासणी प्रयोगशाळा ग्लायकोहिमोग्लोबिन स्टॅडंर्ड प्रोग्राम द्वारे प्रमाणीत केल्या जातात. तसेच टक्केवारी प्रमाण मोनो एस् हे स्वीडन मधे आणि KO500 हे जपान मधे वापरले जाते.

IFCC प्रमाणात रूपांतर

अमेरिकन डायबेटिस असोसिएशन (ADA), युरोपियन असोसिएशन फॉर स्टडी ऑफ डायबेटिस (EASD) आणि इंटरनॅशनल डायबेटिस फेडरेशन (IDF) यांमधील सामंजस्या नुसार भविष्यातील HbA1cची मोजणी ही इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ क्लिनिकल केमेस्ट्री (IFCC)च्या प्रमाणात होणार आहे. IFCCची अंमल बजावणी युरोप मधे २००३ साली झाली, तर युनायटेड किंग्डम मधे १ जून २००९ ते १ ऑक्टोबर २०११ पर्यंत दोन प्रमाणे वापरली गेली.

DCCT आणि IFCC प्रमाणांचे रूपांतरण सुत्र,

IFCC HBA1c (mmol/mol) = [DCCT HBA1c(%) - 2.15] * 10.929

परिणांचा अर्थ

प्रयोग शाळेतील निष्कर्श हे मोजण्याची पद्ध्त, रोग्याचे वय, आणि वेगवेगळ्या व्यक्तींमधील शारीरिक अवस्थानुसार बदलतात. जेव्हा दोन व्यक्तींच्या रक्तात समान शर्करेचे प्रमाण असूनही त्यांच्या HbA1cच्या प्रमाणात तीन टक्यांपर्यत फरक असू शकतो. निर्णय अचूक नसण्याची काही कारणे असू शकतात, त्यामधे रक्त वाहून जाणे, शस्त्रक्रियेमुळे रक्त बदलावे लागणे, ऍनेमिया (शरीरात रक्ताचे प्रमाण कमी असणे) किंवा एरिथ्रोसाईट टर्नओव्हर, (रक्ता मधील जुन्या लाल पेशी जाऊन नवीन लाल पेशी येणे) तीव्र मुत्रविकार, यकृताचे अजार, मोठ्या प्रमाणात क जीवन सत्त्वाचे औषध किंवा एरिथ्रोपोएटिन निदान. सामान्य माणसामधे हे प्रमाण २०-४० mmol/mol ( ४ - ५.९ DCCT %).

HbA1c जास्त प्रमाण रक्तामधे सातत्याने जास्ती शर्करा असलेल्या व्यक्तींमधे, जसे मधुमेह रोग्यांमधे सापडते. मधुमेह रोग्यामधे निदान HbA1cचे रक्तातील प्रमाण साध्य करण्यावर केंद्रीत करता येते. मधुमेह रोग्याची रक्तातील शर्करा पातळी सामान्य असेल तर HbA1c प्रमाण सामान्य संर्दभा प्रामाणे असते. इंटरनॅशनल डायबेटिस फेडरेशन आणि अमेरिकन कॉलेज ऑफ एन्डोक्रानोलॉजी याच्या प्रमाणे, ४८ mmol/mol (७ DCCT %) ही पातळी जास्त बंधनात्मक आसू शकते. ५३ mmol/mol (७ DCCT %)च्या खालील प्रमाण हे कमी झालेल्या A1cचे फायदे कमी करतात, आणि तीव्र ग्लायसेमिक नियंत्रण केल्यास, धोकादायक हायपोग्लायसेमिक अवस्था उद्भवू शकते.

एका नियोजीत अभ्यासामधे ४७,९७० मधुमेही रोगी ज्यांची पातळी ४८ mmol/mol (६.५ DCCT %) पेक्षा जास्ती आहे त्यांचा मृत्यूदर जास्ती आहे असा निर्ष्कश काढला, पण नंतर आंतरराष्ट्रीय अभ्यास मोहिमेने हे अनुमान चुकीचे असल्याची शक्यता दर्शविली.

एका अवलोकना मधे UKPDS ACCORD, ADVANCE आणि VADT यांच्या प्रयोगांनी असे वर्तवले आहे, मधुमेहच्या समस्या (दृष्टीयंत्रणा, मुत्र यंत्रणा, मज्जासंस्था किंवा मॅक्रोवास्कुलर दोष) प्रत्येक १ mmol/mol HbA1c कमी झाल्यास ३% याप्रमाणात कमी होतात.

वैद्यकीय चिकित्सकांनी प्रत्येक रोग्याच्या तब्येती नुसार, त्यांच्या हायपोग्लायसेमियाचा धोका आणि त्यांच्या अन्य वैद्यकीय तक्रारी प्रमाणे त्याचे HbA1c कमी करण्याचे प्रमाण ठरवावे. प्रत्येक रोगी स्वःतावरील हायपोग्लायसेमिया टाळू शकण्यासाठी रोग्याकडून मिळणारी माहिती, डॉक्टरांची तपासणी आणि रोग्याचे स्वःताचे नियंत्रण करण्याची क्षमता उपयोगी पडते.

रक्तातील साखर सतत जास्त असल्यास (त्यामुळे HbA1c) दीर्घकालीन रक्तवहिन्यांचे दोष, हृदय रोग, हृदय विकाराचा झटका, स्ट्रोक, हृदय बंद होणे, मुत्रपिंड निकामी होणे, अंधत्व, पुरुषांमधे लैगिंक दुर्बळता, मज्जासंस्थेच्या तक्रारी ( त्वचेची संवेदना कमी होणे, मुख्यतः पायाची ), अवयव सडणे, गॅस्ट्रोपारेसीस ( पोटातील स्नायूंची प्रतिक्शिप्त हालचाली मंद होवून अन्न पुढे सरकणे कमी होणे किंवा मल बाहेर टाकणे अवघड होणे ). मधुमेहा मधे रक्त शर्करेचे प्रामाण न राखल्यास जखम भरून निघायला वेळ लागण्याचा धोका तात्पुरता उद्भवू शकतो.

प्रमाणापेक्षा HbA1c कमी पातळी काही लोकांमधे लाल पेशींचे आर्युमान कमी करते, त्यामधे ग्लुकोज ६ फॉस्फेट डीहायड्रोजनीज् डेफिशन्सी, सिकल् सेल रोग किंवा अन्य अवकाळी लाल पेशी मृत्य होण्याच्या परिस्थिती र्निमाण होणे असू शकते. रक्तदान केल्यावर नवीन लाल रक्त पेशींमुळे HbA1cचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी होते. तसेच HbA1cचे प्रमाण काही लोकांमधे जास्ती असण्याचे कारण त्यांच्या लाल पेशींचे दीर्घ आयुष्य असु शकते, जसे बी जीवनसत्त्व किंवा फोलेटचा अभाव असणे.

HbA1c DCCT( % ) आणि अपेक्षीत साधारण शर्करा यांचे प्रमाण खालील सुत्रामधे आहे,

eAG(mg/dl) = 28.7 × A1C − 46.7
eAG(mmol/l) = 1.59 × A1C − 2.59

ही माहिती ९५% विश्वसनीय आहे

ग्लायसेटेड हिमोग्लोबिनअंदाजे रक्त शर्करा
(%)((मिलिमोल्/मोल्))[](मिलिमोल्/ली)(मिलिग्रॅम/१००मिली)
5315.4 (4.2–6.7)97 (76–120)
6427.0 (5.5–8.5)126 (100–152)
7538.6 (6.8–10.3)154 (123–185)
86410.2 (8.1–12.1)183 (147–217)
97511.8 (9.4–13.9)212 (170–249)
108613.4 (10.7–15.7)240 (193–282)
119714.9 (12.0–17.5)269 (217–314)
1210816.5 (13.3–19.3)298 (240–347)
1311918.1 (15–21)326 (260–380)
1413019.7 (16–23)355 (290–410)
1514021.3 (17–25)384 (310–440)
1615122.9 (19–26)413 (330–480)
1716224.5 (20–28)441 (460–510)
1817326.1 (21–30)470 (380–540)
1918427.7 (23–32)499 (410–570)

अमेरिकन डायबेटिस असोसिएशन स्टॅंडर्ड ऑफ मेडिकल केर इन डायबेटिस ने २०१० मधे HbA1c ≥ ४८ mmol/mol (≥६.५ DCCT %) हा नवीन माप दंड मधुमेहाच्या इलाजामधे जोडला.

र्निदेश आणि वापर

ग्लायसेटेड हिमोग्लोबिनची तपासणी मधुमेहाच्या शक्यते साठी आणि रूग्णाच्या वाढलेल्या रक्त शर्करा तपासणी साठी वापरतात. बहुतांश लोकांना त्यांच्या रक्तात वाढलेल्या HbA1cची जाणीव रक्त तपासणी पूर्वी कळत नाही. एका रक्त तपासणी मधे HbA1cचे प्रमाण रक्तातील शर्करेची माहिती उपाशी घेतलेल्या रक्त शर्करा चाचणी पेक्षा जास्ती माहिती पुरवते. तरीही उपाशी केलेली रक्त शर्करा तपासणी मधुमेह रोग निदाना मधे महत्त्वाची असते. अमेरिकन डायबेटिस असोसिएशन अनुसार ग्लायसेटेड हिमोग्लोबिनची वर्षातून कमीतकमी दोनदा, रक्त शर्करा ताब्यात असलेल्या रुग्णासाठी, आणि ज्यांची निदान पद्ध्ती बदलेली आहे किंवा ज्यांची रक्त शर्करेची पातळी जास्त आहे त्यांच्या साठी तीन महिन्यांच्या अंतराने तपासणी सुचवलेली आहे.

ग्लायसेटेड हिमोग्लोबिनची तपासणी खाण्यातील पथ्य बदल्यास, सहा आठवड्या पर्यंत करणे अयोग्य आहे. तपासणी मधे लाल रक्त पेशींचे साधारण आयुष्य आणि हिमोग्लोबिनच्या अन्य प्रकारांचे मिश्रण अपेक्षीत असते. त्यामुळे नजिकच्या काळात रक्त वाहून गेले असल्यास / दान केले असल्यास, हिमोलायटिक कारणांमुळे रक्तात लाल पेशी कमी असल्यास, हिमोग्लोबिनच्या रेणूच्या गुणसुत्रात फरक असल्यास जसे सिकल सेल व्याधी असल्यास आणि इतर तत्सम कारणांमुळे मोजणे अयोग्य असते.

ग्लायसेटेड हिमोग्लोबिनच्या असातत्याच्या प्रमाणामुळे, अन्य काही चाचण्या कराव्या असे सुचवण्यात येते. ज्या लोकांमधे HbA1cचे प्रमाण ६४ mmol/mol किंवा त्यापेक्षा कमी असल्यास अतिरिक्त तपासण्या ज्यामधे जास्त साखर आणि कमी साखरेची सरासरी काढली आहे की HbA1c पातळी ही रक्त शर्करेची पातळी दिवसात जास्त बदलली नाही हे समजते, त्या करणे अपेक्षीत असते. सातत्याने रक्त शर्करा तपासणारी यंत्रे मधुमेह रुग्णांना आपली साखर मिनीटांच्या अंतराने तपासू देतात. विमा योजनांमधे या यंत्रांवर फायदा मिळतो पण अमेरिकेत मेडिकेर ने मात्र याला सूट दिली नाही. यासाठी लागणारी सामुग्री महाग असते, कारण यात वापरलेला संवेदक हा दर आठवड्याला बदलणे अपेक्षीत असते. या व्यतिरिक्त ग्लायकोमार्क किंवा १,५ अनहायड्रोग्लुसिटॉल ही रक्त शर्करेच्या अनियमीत मात्रे मधे सुध्धा उपयोगी असते. ग्लायकोमार्क ही दोन आठवड्या मधे रुग्ण किती वेळा जास्ती रक्त शर्करा ( १८० mg/dL पेक्षा जास्त ) अनुभवतो ते दाखवते.

आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी तपासणी मधे, HbA1चे प्रमाण मधुमेह आणि मुत्र विकार असलेल्या रुग्णांमधे सापडते. या करता थायोर्बाबिट्युरीक आम्ल तपासणी मधे मुत्र विकार असलेल्या रूग्णांच्या HbA1चे प्रमाण सामान्य माणसा इतके सापडते, तेंव्हा जास्ती HbA1 सापडण्याचे कारण अन्य कोणता हिमोग्लोबिनचे शर्करेचा संयोग असू शकतो. ऑटो इम्युन हिमोलायटिक ऍनिमिया मधे HbA1चे प्रमाण हे सापडणे अवघड असते. याकरता प्रेड्नीसॉलोन (पीएस्एल)ची नियंत्रण HbA1चे प्रमाण सापडून देऊ शकते. पर्यायी फ्रक्टोसामाईन तपासणी ही या परिस्थितीत वापरल्यास २ ते ३ आठवड्यातील साखरेचे साधारण प्रमाण सांगू शकते.

सर्व महत्त्वाच्या संस्था ज्या अंतरराष्ट्रीय मधुमेह फेडरेशन (IDF), युरोपियन असोसिएशन फॉर स्टडी ऑफ डायबेटिस आणि अमेरिकन डायबेटिस असोसिएशन यांच्या सल्या नुसार, HbA1cची महत्त्वाची पातळी ४८ mmol/mol (६.५ DCCT %) ही आहे. या समिती सुचवतात की जेंव्हा HbA1cची तपासणी शक्य नसेल तेंव्हा, उपाशी पोटी रक्त शर्करा आणि ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट करावी.

व्यायामाने घडणारे बदल

एका संयक्त अभ्यासामधे असे आढळून आले, जेंव्हा (एरोबिक + स्नायूंचा व्यायाम) आणि फक्त एरोबिक या व्यायांमधे फक्त एरोबिक व्यायाम हा एरोबीक आणि स्नायू व्यायामापेक्षा कमी उपयोगी असतो. व्यायामुळे ग्लायसेटेड हिमोग्लोबिनचे प्रमाण ९ mmol/mol ने कमी होते. हाच परिणाम दीर्घ पथ्य आणि औषधे किंवा इन्सुलीन ने साध्य करता येतो ६.५ ते ९ mmol/mol ( ०.६ ते ०.९ पॉइंट).

प्रमाण आणि तपासणी

हिमोग्लोबिन A1cची तपासणी IFCC पद्धती HPLC-CE & HPLC-MS संस्थे कडून प्रमाणीत आहे. या करिता (mmol/mol) हे युनिट वापरले जाते.

संदर्भ

  1. ^ Change to HbA1c values at Diabetes UK, 2013