ग्रेनेडाचा ध्वज
नाव | ग्रेनेडाचा ध्वज |
वापर | नागरी वापर |
आकार | ३:५ |
स्वीकार | ७ फेब्रुवारी १९७४ |
ग्रेनेडाच्या नागरी ध्वजामध्ये लाल रंगाची बाह्य पट्टी असून मध्ये हिरव्या व सोनेरी रंगाचे त्रिकोण आहेत. वर व खाली असलेले सहा तारे ग्रेनेडामधील सहा जिल्हे दर्शवतात तर मध्यभागी असलेला लाल वर्तूळातील मोठा तारा राजधानी सेंट जॉर्जेस दर्शवतो. जायफळ हे ग्रेनेडामधील सर्वात मोठे पीक असल्यामुळे डाव्या बाजूस जायफळाचे साल दाखवले आहे.