ग्रासियास आ दियोस प्रांत
ग्रासियास आ दियोस प्रांत हा होन्डुरासच्या अठरा प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत देशाच्या ईशान्य भागात असून देशाच्या इतर भागापासून दुरावलेला आहे. १६,९९७ किमी२ क्षेत्रफळ असलेला हा प्रांत होन्डुरासमधील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा प्रांत असला तरी येथील लोकसंख्या फक्त ९४,५५० (२०१५चा अंदाज) आहे.
याची राजधानी पुएर्तो लेम्पिरा येथे आहे. या प्रांतात गुन्हेगारीचे प्रमाण अधिक आहे. देशातील इतर भागातून येजा करण्यास कठीण असल्याने होन्डुरास पोलीस व इतर सुव्यवस्था अधिकारी येथे प्रभावी नाहीत.