Jump to content

ग्रँड ट्रंक एक्सप्रेस

ग्रँड ट्रंक एक्सप्रेसचा फलक
ग्रँड ट्रंक एक्सप्रेसचा मार्ग

१२६१५/१२६१६ ग्रँड ट्रंक एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. दक्षिण रेल्वेद्वारे चालवली जाणारी रेल्वे तमिळनाडूची राजधानी चेन्नईला दिल्लीसोबत जोडते. दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्गावरून ग्रँड ट्रंक एक्सप्रेस चेन्नई सेंट्रल रेल्वे स्थानक ते दिल्ली सराई रोहिल्ला रेल्वे स्थानक ह्या स्थानकांदरम्यान रोज धावते.

१ जानेवारी १९२९ पासून चालू असलेली ग्रँड ट्रंक एक्सप्रेस भारतीय रेल्वेच्या सर्वात जुन्या व ऐतिहासिक गाड्यांपैकी एक आहे. सुरुवातीच्या काळात ही गाडी पेशावरमंगळूर ह्या शहरांदरम्यान धावत असे. स्वातंत्रानंतर ती चेन्नई ते नवी दिल्ली दरम्यान धावू लागली. तमिळनाडू एक्सप्रेस ही जलद गाडी देखील दिल्ली व चेन्नई दरम्यान रोज धावते.