गौरी शिंदे
गौरी शिंदे | |
---|---|
जन्म | ६ जुलै, १९७४ पुणे |
राष्ट्रीयत्व | भारत |
कार्यक्षेत्र | दिग्दर्शक |
प्रमुख चित्रपट | इंग्लिश विंग्लिश |
पती | आर. बाल्की |
गौरी शिंदे ( ६ जुलै १९७४) ही एक भारतीय चित्रपट दिग्दर्शिका आहे. तिने दिग्दर्शित केलेला २०१२ सालचा श्रीदेवी अभिनीत इंग्लिश विंग्लिश हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला व ह्या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअर पुरस्कारासह अनेक सिने-पुरस्कार मिळाले. २०१६ साली डियर जिंदगी हा तिचा दुसरा चित्रपट देखील गाजला.
चित्रपट यादी
दिग्दर्शक
वर्ष | चित्रपट | पुरस्कार |
---|---|---|
२०१२ | इंग्लिश विंग्लिश | फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पदार्पण पुरस्कार आय.आय.एफ.ए. पुरस्कार झी सिने पुरस्कार |
२०१६ | डियर जिंदगी |
बाह्य दुवे
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील गौरी शिंदे चे पान (इंग्लिश मजकूर)