Jump to content

गौतमी कपूर

गौतमी कपूर
२०१० में गौतमी कपूर
जन्म २१ जून, १९७४ (1974-06-21) (वय: ५०)
महाराष्ट्र, भारत
कार्यक्षेत्रअभिनेत्री, मॉडल
पती

मधुर श्रोफ (घटस्फोट)

राम कपूर (ल. २००३)

गौतमी कपूर (जन्म:गौतमी गाडगीळ; २१ जून १९७४) ह्या एक भारतीय दुरचित्रवाहिनी तथा चित्रपट अभिनेत्री आणि मॉडेल आहेत.[] स्टार प्लस या दुरचित्रवाहिनी वरील कौन है दिल में मधील जयाच्या भूमिकेसाठी त्या खास करून ओळखल्या जातात. तसेच त्यांनी सोनी टीव्ही वरील घर एक मंदिर आणि पर्वरीश - सीझन 2 या दोन मालिकेत मुख्य भूमिका निभावली आहे. तसेच गौतमी यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्येही काम केले आहे.[] [] []

वैयक्तिक जीवन

गौतमी कपूर आणि राम कपूर हे दोघे घर एक मंदिर या मालिकेत एकत्र काम करत असताना त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. मुळात गौतमी शांत, गंभीर आणि एकलकोंडी तर राम कपूर हे हसत-खेळत, पार्टीत रमणारे असे होते. त्याच सोबत गौतमी ह्या मराठी तर राम कपूर हे पंजाबी होते. त्याशिवाय गौतमी ह्या घटस्फोटित होत्या. जेव्हा राम कपूर यांनी गौतमीला आपल्या प्रेमसंबंधाची कबुली दिली तेव्हा लगेचच गौतमी ने होकार दिला. जेव्हा लग्न करायचे ठरवले तेव्हा प्रथम गौतमीच्या घरून थोडा विरोध झाला, परंतु अंततः होकार दिल्या गेला. शेवटी १४ फेब्रुवारी २००३, म्हणजे व्हॅलेंटाईन डेला या दोघांमध्ये लग्नाची गाठ बांधल्या गेली. नंतर त्यांना दोन मुले झालीत, अनुक्रमे मुलगी सिया आणि मुलगा अक्स.[][]

गौतमी कपूर आणि राम कपूर ११व्या इंडियन दूरचित्रवाणी अवॉर्डच्या वेळी

दुरचित्रवाहिनी

वर्षमालिका
1997-1999 शटरडे सस्पेंश
1998 फॅमिली नंबर 1
2000–2002 घर एक मंदिर
2002 धड़कन[]
कहता है दिल
2003–2004 लिपस्टिक
2007–2008 क्योंकि सास भी कभी बहू थी
2013 क़ुबूल है
खेलती है जिंदगी आंख मिचोली
2015 तेरे शहर में
परवरिश २
2020 स्पेशल ऑप्स

चित्रपट

वर्ष शीर्षक भूमिका
1999 बिंधास्तमयूरी
2003 कुछना कहोटोनी
2006 फनारुबीना 'रूबी'
2012 स्टूडेंट ऑफ द ईयरगायत्री नंदा
2014 शादी के साइड इफेक्ट्सआंचल
2014 लेकर हम दीवाना दिलविवाह सलाहकार

पुरस्कार

वर्ष पुरस्कार वर्ग मालिका परिणाम
2007 इंडियन टेली अवॉर्ड फॉर बेस्ट ऍक्टरेस इन अ लिड रोल इंडियन टेली अवॉर्ड फॉर बेस्ट ऍक्टरेस इन अ लिड रोल क्योंकि सास भी कभी बहू थी नामांकित

संदर्भ

  1. ^ Gautami Kapoor, Siddharth Shukla and other TV actors look forward to a 'family Diwali' this year - DNA India
  2. ^ "Less melodrama in 'Khelti Hai Zindagi...: Gautami Kapoor". ९ सप्टेंबर २०१३ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ८ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  3. ^ Ulka Gupta and Gautami Kapoor to make a comeback - DNA India
  4. ^ Tellychakkar interviews Gautami Kapoor on her return to small screen
  5. ^ "Happy Birthday Ram Kapoor: 10 interesting, unknown facts about the Bade Achhe Lagte Hain actor". Indian Express. 1 September 2017.
  6. ^ "Love story | एकमेकांच्या अगदी विरुद्ध स्वभावाचे होते राम कपूर-गौतमी गाडगीळ, जाणून घ्या कसे बनले 'हमसफर'…".
  7. ^ "Real life couples we want to see on TV again". India Today. 7 July 2016 रोजी पाहिले.

बाह्य दुवे