गोविंद राघो खैरनार
गोविंद राघो खैरनार | |
---|---|
जन्म | एप्रिल १४, इ.स. १९४२ नाशिक, महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
नागरिकत्व | भारतीय |
कारकिर्दीचा काळ | १९६४ पासून पुढे |
अपत्ये | २ |
वडील | राघो खैरनार |
गोविंद राघो खैरनार ऊर्फ गो.रा. खैरनार (एप्रिल १४, इ.स. १९४२ - ) हे महाराष्ट्रातील मुंबई महानगरपालिकेचे माजी उपायुक्त आहेत. उपायुक्तपदावर असताना त्यांनी बेकायदेशीर वास्तूंवर, आणि पदपथावरील बेकायदेशीर विक्रेत्यांवर अतिक्रमणाबद्दल घणाघाती कारवाई केली. असे करताना त्यांनी ह्या बेकायदेशीर गोष्टींना उत्तेजन देणाऱ्या तत्कालीन राजकीय नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यामुळे ते राज्यकर्त्यांच्या काळ्या यादीत आले.
कारकीर्द
१९६४ मध्ये त्यांनी महाराष्ट्र राज्य सरकारच्या सेवेत कारकून म्हणून सुरुवात केली. इ.स. १९७४ मध्ये ते बृहनमुंबई महानगरपालिका मध्ये रुजू झाले.
बेकायदा इमारतींवर हातोडा चालविणारे वन मॅन डिमॉलिशन आर्मी व मुंबई महापालिकेचे माजी उपायुक्त गो. रा. खैरनार हे मेधा पाटकर यांनी मुंबईत पुकारलेल्या बिल्डरविरोधी आंदोलनात सहभागी झाले. आपल्या महापालिकेच्या कारकिर्दीत भ्रष्टाचार आणि बेकायदा बांधकामे यांच्या विरुद्ध लढा देतांना कुख्यात गुंडांपासून विख्यात राजकारण्यापर्यंत अनेकांना ते निर्भयपणे सामोरे गेले. खैरनारांनी आपल्या एकाकी झुंज या आत्मचरित्रात या सर्व प्रकरणाचा ऊहापोह केला आहे.
बाह्य दुवे
- रसिक.कॉम Archived 2004-09-17 at the Wayback Machine. (मराठी मजकूर)
- टाइम्स ऑफ इंडिया (इंग्लिश मजकूर)