गोविंद काजरेकर
प्रा. गोविंद गंगाराम काजरेकर हे एक मराठी कवी, समीक्षक आणि मालवणी बोली या विषयावर लेिहिणारे लेखक आहेत.[ संदर्भ हवा ] गोविंद काजरेकर यांचा जन्म २९ मे १९६९ मध्ये कोकणातील सावंतवाडी या तालुक्यातील तळवडे या गावी झाला. प्राथमिक ते उच्च माध्यमिक पर्यंतचे शिक्षण याच गावी झाले. महाविद्यालयीन शिक्षण सावंतवाडी येथील श्री. पंचम खेमराज महाविद्यालय येथे तर पदव्युत्तर शिक्षण मुंबई विद्यापीठात झाले. राजन गवस यांचे कथात्म साहित्य याविषयावर त्यांनी गोवा विद्यापीठ येथून पी. एच. डी. ही पदवी प्राप्त केली.[ संदर्भ हवा ] सध्या ते गोगटे- वाळके महाविद्यालय, बांदा, ता. सावंतवाडी येथे प्राचार्य व मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.[ संदर्भ हवा ]
काजरेकर यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक एम. ए. च्या दोन पुस्तकांचे लेखन केले आहे.[ संदर्भ हवा ]
काजरेकर हे २०१५ पासून मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात पीएच. डी.चे मार्गदर्शक आहेत.[ संदर्भ हवा ]
पुस्तके
- उरल्यासुरल्या जगण्याचे रिमिक्स’ ग्रंथाली प्रकाशन, २००९ (कवितासंग्रह )[ संदर्भ हवा ]
- कोकणातील कृषिसंस्कृती आणि लोकगीते, दर्या प्रकाशन, २०१४[ संदर्भ हवा ]
- राजन गवस यांचे कथात्म साहित्य, शब्द प्रकाशन, २०१८[ संदर्भ हवा ]
- मालवणीतल्या वाटा, शब्दालय प्रकाशन, २०१८[ संदर्भ हवा ]
- समकालीन कविता: सांस्कृतिक परिप्रेक्ष्य, अक्षर प्रकाशन, २०२०[ संदर्भ हवा ]
- सुन्नतेचे सर्ग , वर्णमुद्रा प्रकाशन, २०२२ (कविता संग्रह)
पुरस्कार
- राज्य शासनाचा बहिणाबाई चौधरी काव्यपुरस्कार, २०१०[ संदर्भ हवा ]
- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा विशाखा काव्यपुरस्कार, २०१०[ संदर्भ हवा ]
- मराठवाडा साहित्य परिषदेचा कुसुमताई देशमुख काव्यपुरस्कार२०१०[ संदर्भ हवा ]
- हिंगोली येथील बाराशिव काव्यपुरस्कार २०१०[ संदर्भ हवा ]