Jump to content

गोविंद आफळे

कै. गोविंद रामचंद्र आफळे (जन्म : १५ फेब्रुवारी १९१७) हे एक मराठीतून कीर्तने करणारे परंपरागत कीर्तनकार होते. त्यांचे पूर्वजही कीर्तनकार होते आणि सुपुत्र चारुदत्त आफळे हेही कीर्तनकार आहेत. गोविंदस्वामी आफळे यांना राष्ट्रीय कीर्तनकार म्हणले जाते, कारण त्यांची कीर्तने केवळ धार्मिक आणि पौराणिक विषयांवरच नसून अनेक सामाजिक आणि राजकीय गोष्टी त्यांच्या कीर्तनांचे विषय असत. त्यांनी कीर्तनाचे विशेष शिक्षण पुण्याच्या नारद मंदिरात घेतले. तिथेच त्यांची वर्षभर कीर्तने होत असत. नभोवाणीवरही आफळेस्वामींची कीर्तने नित्यनियमाने होत असत.

गोविंद आफळे हे एक मराठी लेखक, नाटककार, पुस्तक प्रकाशक आणि पोवाडे लिहिणारे व गाणारे शाहीर होते. आफळे कुटुंब हे मूळचे सातारा जिल्ह्यातील माहुली गावाचे असल्याने आफळेस्वामींनी ’आम्ही माहुलीकर’ नावाचे एक आत्मकथनात्मक पुस्तकही लिहिले आहे. गं.ना. कोपरकरांनी संपादित केलेल्या ’कीर्तनाची प्रयोग प्रक्रिया’ नावाच्या ग्रंथाचे गोविंदराव आफळे उपसंपादक होते.

गोविंद रामचंद्र आफळे यांनी लिहिलेली पुस्तके

  • आम्ही आहो बायका (नाटक)
  • आर्यांचे स्वाहाकार
  • उपासना
  • टाकीचे घाव
  • तू बायकोना त्याची? (नाटक)
  • प्रतापगडचा रणसंग्राम (नाटक)
  • बैल गेलानी झोपा केला (नाटक).
  • महाकवि कालिदास (नाटक) - संगीत दिग्दर्शन : चारुदत्त आफळे
  • माहुलीची माणसं
  • संसार तरंग
  • सावरकर गाथा (लेखन आणि प्रकाशन :गोविंद आफळे)
  • स्वराज्य संग्राम