Jump to content

गोवा मुक्ती दिन

गोवा मुक्ती दिन, दमण आणि दीव मुक्ति दिन
खलाशी आणि इतर जवानांच्या स्मरणार्थ बांधलेले स्वतंत्र सैनिकांचे स्मारक, भारतीय नौसेना गोमंतक []
साजरा करणारे गोमंतक, भारतीय
महत्त्व पोर्तुगीजां पासून गोवा राज्याला मिळालेले स्वातंत्र्य
दिनांक १९ डिसेंबर
वारंवारता वार्षिक
First time १९ डिसेंबर १९६१
यांच्याशी निगडीतगोवा मुक्तिसंग्राम

गोवा मुक्ती दिन (पोर्तुगीज:Dia da libertação de Goa) (कोकणी:गोंय मुक्ति दिस) गोवा मुक्ती दिन, भारतामध्ये दरवर्षी १९ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. पोर्तुगीजांनी इथं आल्यानंतर ख्रिस्ती धर्मपरिवर्तनाची मोहीमच सुरू केली. आणि त्याला विरोध करणाऱ्यांवर अघोरी अत्याचार सुरू केले.[] पद्धतशीर हिंदू विरोधी हिंसाचार, जबरदस्तीने केलेले हिंदूंचे धर्मांतर , दस्तऐवजीकरण केलेले हिंदू हत्याकांड , हिंदू मूर्ती भंजन, हिंदू मंदिरांचा विध्वंस आणि हिंदू मुद्रा विटंबना, तसेच हिंदू शैक्षणिक केंद्रांचा विनाश या पोर्तुगीजांच्या अत्याचारांना गोव्याचे मूळ हिंदू कंटाळले होती. त्यामुळे सशस्त्र आणि सविनय अशा दोन्ही मार्गानं गोवन जनतेने स्वातंत्र्यासाठी आंदोलने सुरू केली. भारतीय सैन्याने 'ऑपरेशन विजय' राबवत गोवा मुक्त केला. भारताने गोवा आणि दमण दीव स्वतंत्र केले. गोवा या राज्याला दिनांक १९ डिसेंबर १९६१ रोजी पोर्तुगीजांपासून मुक्ती मिळाली म्हणून या दिवशी गोवा मुक्ती दिन साजरा केला जातो. [] यादिवशी भारतीय सेनेनं पोर्तुगीजांपासून गोवा मुक्त केला. तसेच या दिवशी भारत युरोपियन राजवटीपासून पूर्णपणे मुक्त झाला होता.[][]याच दिवशी संध्याकाळी पोर्तुगीज सरकारने भारतीय सैन्यापुढे सपशेल शरणागती पत्करली आणि रात्री आठ वाजता पोर्तुगीज गव्हर्नर जनरल वासाल द सिल्वा यानी शरणांगती पत्रावर सही केली. ऑपरेशन विजय ही मोहीम काही तासांत फत्ते झाली.[]

गोवा, दमण आणि दीव मुक्ती दिन

प्राचीन भारतातील गोवा, दमण आणि दीव तसेच दादरा आणि नगर हवेली या भागावर जवळपास ४५० वर्षे राज्य होते. इ.स. १७५२ सालापर्यंत आफ्रिका खंडाच्या दक्षिणेपासून आग्नेय आशियापर्यंत, अश्या हिंदी महासागरातील सर्व पोर्तुगीज वसाहतींना पोर्तुगीज भारत या संज्ञेने उल्लेखले जाई.[] भारत स्वतंत्र झाल्यानंतर पोर्तुगीजही आपोआप गोव्यातून काढता पाय घेतील असा अंदाज होता. पण तसं झालं नाही. उलट पोर्तुगालचा शासक सालाझार अधिक कठोर झाला. त्यानं इथं अत्याचारांची मालिकाच सुरू केली. पोर्तुगीजांविरोधात उठाव होऊ नये म्हणून कडक निर्बंध टाकले. लिहिणे, बोलणे यावरही निर्बंध लावले गेले. [] ‘ऑपरेशन विजय’ अंतर्गत पोर्तुगीजव्याप्त गोवा प्रदेशावर हल्ला केला गेला.

या काळात पाच वेळा गोवा इन्क्विझिशन केले गेले.

भारतीय नौदल जहाज गोमंतक येथील युद्ध स्मारक हे भारतीय नौदलाने अंजेदिवा बेट, गोवा आणि दमण आणि दीव प्रदेशांच्या मुक्तीसाठी हाती घेतलेल्या “ऑपरेशन विजय” मध्ये १९ डिसेंबर १९६१ रोजी आपले प्राण बलिदान देणाऱ्या सात तरुण शूर खलाशी आणि इतर जवानांच्या स्मरणार्थ बांधले गेले.[]

गोवा मुक्ती दिनानिमित्त दर वर्षी गोव्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते.[१०]

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Goa,Daman Diu Liberation Day Anniversary". Indiannavy.nic.in. 20 December 2018 रोजी पाहिले.
  2. ^ team, abp majha web (2021-12-19). "Goa Liberation Day : आज गोवा मुक्ति दिन; काय आहे मुक्ति संग्रामाचा ज्वलंत इतिहास?". marathi.abplive.com. 2022-09-28 रोजी पाहिले.
  3. ^ "जब भारतीय सेना ने गोवा को 450 साल पुराने पुर्तगाली शासन से कराया था आजाद" (Hindi भाषेत). Dainik Jagran. 19 December 2018.CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ Bose, Abhimanyu (December 19, 2018). "Country Celebrates 57th Goa Liberation Day, Parade Held In Coastal State". NDTV.
  5. ^ "This is how Goa celebrated its 57th Liberation day". The Times of India. December 20, 2018.
  6. ^ "गोवा मुक्ती दिन; आग्वाद किल्ल्यातील काळरात्र". eSakal - Marathi Newspaper. 2022-09-28 रोजी पाहिले.
  7. ^ "Here's to the folks of Goa, Daman and Diu!". Rediff.com. 19 December 2011.
  8. ^ team, abp majha web (2021-12-19). "Goa Liberation Day : आज गोवा मुक्ति दिन; काय आहे मुक्ति संग्रामाचा ज्वलंत इतिहास?". marathi.abplive.com. 2022-09-28 रोजी पाहिले.
  9. ^ "Here's to the folks of Goa, Daman and Diu!". Rediff.com. 19 December 2011.
  10. ^ "On Goa Liberation Day, govt calls to make state plastic-free". Indian Express. December 19, 2018.