Jump to content

गोळी खत

गोळी खत हे वेगवेगळ्या खताच्या मिश्रणांच्या गोळ्यांचे खत होय. या गोळीला ब्रिकेट असेही संबोधले जाते. शेतातील झाडांच्या मूळाशी जमिनीत गाडून हे खत पिकाला दिले जाते. याची पहिली चाचणी भात पिकावर घेतली गेली. शेती तज्ज्ञ डॉ. सावंत यांनी यावर अभ्यास केला. पहिले प्रयोग युरिया व डी.ए.पी. या दोन खतांच्या मिश्रणाची खतगोळी तयार करून भाताच्या खाचरात भात लावणीच्या वेळी चार चोथ्याच्या मध्ये जमिनीत गाडली. यामुळे खताची मात्रा कमी लागली व उत्पादनात वाढ झाली. चार सूत्री भात लागवडीपैकी हे एक सूत्र आहे.