गोळाभात
गोळाभात मुख्यत्वे महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ आहे.
साहित्य
पूर्वतयारी
प्रथम गोळे बनविण्यासाठी चण्याच्या डाळीचा भरडा(जाड दळलेले पिठ) घेउन त्यात हळद,तिखट,मिठ,ओवा,हिंग,धनेकुट,जिरेकुट,तेलाचे मोहन ई.टाकुन त्याला घट्ट भिजवुन त्याचे मुठीमध्ये दाबुन गोळे बनवावे.
कृती
भात शिजविण्यास टाकावा.थोडा शिजल्यावर व पाणी आटल्यावर, त्यावर तयार केलेले गोळे टाकावे व पुन्हा भात शिजु द्यावा.
सजावट
भात वाढल्यावर त्यावर गोळा कुस्करून वाढावा.त्यावर हिंगाची फोडणी वाढुन कालवुन खाल्ल्यास चवदार लागतो.
इतर माहिती
कोणी भात शिजवतांना त्यात थोडी हळद घालतात.त्याने भातास चांगला पिवळा रंग येतो.