Jump to content

गोळाफेक

गोळाफेक करताना खेळाडू

गोळाफेक हा एक वैयक्तिक खेळ आहे.

क्रीडांगण

७ फूट व्यासाचे वर्तुळ असते. वर्तुळमध्याजवळ फेकीच्या दिशेने ४० अंशाll जाडीच्या व व्यासाची रेषा ५.५ सेंटीमीटर वर्तुळाच्या बाहेरून असते.

साहित्य

गोळा- लोखंडी किंवा पितळी असतो.

  • पुरूषांसाठी- वजन- ७.२६ किलोग्रॅम, परिघ- ११० ते १३० मिलीमीटर.
  • स्त्रियांसाठी- वजन- ४ किलोग्रॅम, परिघ- ९५ ते ११० मिलीमीटर.

खेळाचे स्वरूप व नियम

या खेळात एकावेळी एकच खेळाडू असतो. स्पर्धेत ८ किंवा ८ पेक्षा कमी खेळाडू असतील तर प्रत्येकाला सहा प्रयत्न दिले जातात. मात्र स्पर्धक ८ पेक्षा जास्त असल्यास प्रत्येकाला तीन प्रयत्न दिले जाऊन ८ अंतिम स्पर्धक काढतात व त्यांना परत तीन प्रयत्न दिले जातात. जास्तीत जास्त अंतर गोळा ज्याने टाकला त्याप्रमाणे क्रमांक दिले जातात. प्रत्येक फेकीचे लगेच मोजमाप घेतले जाते. गोळा पडेल त्या वर्तुळाची कड ते फेकीच्या वर्तुळाची आतील कड असे अंतर मोजतात. स्पर्धकाने गोळा आपल्या गळपट्टीच्या हाडाजवळून फेकावा असा नियम आहे. तसा जर गोळा फेकला नाही तर स्पर्धक बाद ठरतो. गोळा फेकल्यावर तोल गेल्यास ती अयोग्य फेक मानली जाते. फेकीच्या अंतरावरून विजेते क्रमांक काढले जातात.