गोलाप बोर्बोरा
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | ऑगस्ट २९, इ.स. १९२६ गोलाघाट जिल्हा | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | मार्च १९, इ.स. २००६ गुवाहाटी | ||
नागरिकत्व |
| ||
शिक्षण घेतलेली संस्था | |||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
गोलाप बोर्बोरा (२९ ऑगस्ट १९२६ - १९ मार्च २००६) हे १९७८ ते १९७९ पर्यंत भारतीय आसाम राज्याचे मुख्यमंत्री होते. ते आसामचे पहिले बिगर काँग्रेस मुख्यमंत्री होते. बोर्बोरा हे १९६८ ते १९७४ दरम्यान राज्यसभेचे सदस्य पण होते.[१][२][३]
बोरबोरा हे राम मनोहर लोहिया [३] आणि जय प्रकाश नारायण यांचे अनुयायी होते आणि स्वातंत्र्य चळवळीदरम्यान त्यांना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला होता. [१] त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांपासून ते सक्रिय कामगार संघटनांमध्ये होते. [३] त्यांनी शेतकरी चळवळींचे, कामगार संघटनेच्या आंदोलनांचे नेतृत्व केले आणि अनेक वेळा तुरुंगात गेले.[३] स्वातंत्र्यानंतर त्यांना भारताच्या वेगवेगळ्या भागात नऊ वेळा तुरुंगवास भोगावा लागला होता आणि शेवटची वेळ आणीबाणीच्या काळात त्यांना १९ महिने तुरुंगवास भोगावा लागला होता. [३] आसाममध्ये त्यांनी सरतचंद्र सिन्हा यांच्यानंतर जनता पक्षाच्या सरकारचे नेतृत्व केले.[१]
संदर्भ
- ^ a b c "Golap Borbora passes away". www.telegraphindia.com. The Telegraph. 19 March 2006. 20 February 2021 रोजी पाहिले.
- ^ "Bollywood Movie Actress Renu Saikia Biography, News, Photos, Videos".
- ^ a b c d e Ajay, Singh (12 Jan 2015). "Nothing has been done in Assam in the last 30 years: Golap Borbora". India Today (इंग्रजी भाषेत). India Today. 20 February 2021 रोजी पाहिले.
- आसामचे माजी मुख्यमंत्री गुलाब बोरबोरा आता नॉर्थ ईस्ट न्यूज एजन्सी नाहीत, 1-15 एप्रिल 2006
- गोलाप बोरबोरा यांचे निधन, द टेलिग्राफ, सोमवार, २० मार्च २००६