Jump to content

गोराडवाडी

  ?गोराडवाडी

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरमाळशिरस
जिल्हासोलापूर जिल्हा
भाषामराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
• आरटीओ कोड

• एमएच/

गोराडवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

गोरडवाडी हे गाव माळशिरस पासून ८ km अंतरावर आहे. हे गाव सातारा - लातूर राष्ट्रीय महामा्गावर असून , सातारा जिल्ह्याच्या सीमेजवळ जवळ आहे. गोरडवाडी आणि गारवाड च्या सीमेवर सुळकाई - तुकाई मंदिर असून ते सोलापूर जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर आहे.. जवळच ५ km वर वीर संताजी घोरपडे यांची समाधी आहे. म्हसवड १८ km अकलूज सुद्धा २० km अंतरावर आहे. या गावाला निरा उजवा कालवा द्वारे पाणी पुरवठा होतो. गोरडवाडी हे गाव माळशिरस तालुक्यातील एक प्रगत गाव म्हणून ओळखले जाते. गोरडवाडी गावचे ग्रामदैवत बिरोबा आहे. बिरोबाचे मोठे मंदिर असून हे मंदिर बनामध्ये आहे.याला बिरोबा बन म्हणून ओळखले जाते. या बिरोबा देवाची वर्षातून दोन वेळा यात्रा भरते. याशिवाय नाथ मंदिर , बाळूमामा मंदिर, राम मंदिर, हनुमान मंदिर, धुळोबा मंदिर, मायक्का मंदिर अशी मंदिर आहेत. गावामध्ये सर्व धर्मीय, सर्व जाती जमातीचे लोक एकोप्याने आणि गुण्या गोविंदाने राहतात.. गावामध्ये वनांची संख्या जास्त आहे. उसाचे क्षेत्र आणि उत्पादनसाठी गोरडवाडी जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे. तसेच या गावातून आंबे परदेशी निर्यात होतात. गावामध्ये धनगर समाज जास्त असून इतर ही समाज आहेत. गावाची पूर्वीची असणारी दुष्काळी ओळख गावाने पुसून टाकून गाव एक प्रगत गाव म्हणून ओळखले जाते.

गजीढोल हा धनगर समाजाचे लोकनृत्य असून ह्या गावातील गजीढोल मंडळ पूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे.

सुळकाई - तुकाई या शिखराला खूप पर्यटक भेट देत असतात. शिखराच्या पायथ्याशी असलेल्या आंब्याचा बागा आणि ऊसाची शेत बघून मन मोहरून जाते. जवळच संभाजी बाबा समाधी आहे.

गावामध्ये दिवाळी पाडवाया दिवशी मेंढ्या पळवण्यचा कार्यक्रम बघण्यासारखा असतो..


.

हवामान

येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.

लोकजीवन

गावात धनगर समाज जास्त असून ते मेंढपाळ आहेत. गाव शेतीवर अवलंबून असून अलीकडे उद्योगधंदे वाडायला लागले आहेत. पशुपालन व्यवसाय आहेत. दुगधव्यवसाय अलीकडे भरभराटीस आला आहे.

प्रेक्षणीय स्थळे

बिरोबा मंदिर, बिरोबा बन , बिरोबा यात्रा , बाळूमामा मंदिर , बाळूमामा उत्सव, सुळकाई - तुकाई मंदिर, सुळकाई शिखर हे सोलापूर जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर आहे. आंब्याच्या बागा. , गोरडवाडी वनक्षेत्र मध्ये असणारे वने, जवळच वीर संताजी घोरपडे यांची समाधी, संभाजी बाबा समाधी

नागरी सुविधा

जवळपासची गावे

इस्लामपूर, मांडकी, रेडे , जळभवी, कारखेल, गारवाड , तरंगफळ, मोटेवाडी, भांबुर्डी, माळशिरस ही शेजारची गावे आहेत

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate