गोरयो हामागूची
गोरयो हामागूची जपान देशातील प्रसिद्ध असे व्यक्तिमत्त्व होय.त्यांना 'जीवंत देवता' म्हणून ओळखले जाते.[१]
इतिहास
गोरयो हामागूची यांचा जन्म १५ मे इ.स.१८२० साली हिरोगोवा,वाकायामा याठिकाणी झाला.त्यांचा परिवार हा व्यापारी होता.त्यांच्या परिवाराचा शिमोसा आणि की या प्रांतात व्यापार चालत असे.
कार्य
यामसा कॉर्पोरेशनचे ते सातवे मालक होते.ते एक चांगले प्रवक्ता होते.इ.स.१८५४ साली हिरोगोवा येथे आलेल्या त्सुनामी पासून हजारो गावकऱ्यांचा जीव त्यांनी वाचवला होता.याच कार्यामुळे त्यांना 'जीवंत देवता'म्हणून संबोधले जाऊ लागले.अशा या महान व्यक्तिमत्त्वाचा मृत्यू २१ एप्रिल इ.स.१८८५ साली झाला.
संदर्भ
१.和歌山県 広川町 https://www.town.hirogawa.wakayama.jp › ... Hamaguchi Goryo|Inamura-no-Hi no Yakata
- ^ author., 小泉八雲, 1850-1904,. 五兵衛と津波 = Gohe and a tsunami. ISBN 978-4-469-22251-7. OCLC 951610817.CS1 maint: extra punctuation (link)