गोफण
गोफण हे शेतीतील धान्य पक्ष्यांनी/प्राण्यांनी खाऊ नये म्हणून त्यांना दगड मारून पळविण्यासाठी वापरण्यात येणारे एक मानवचलीत उपकरण आहे. हे उपकरण गोफासारखे विणलेले असते.याच्या दोन दोऱ्यांच्या मध्ये असलेल्या विशिष्ट जागेत दगड ठेवल्या जातो. त्यानंतर गोफण हातात धरून वेगाने स्वतःचे डोक्याभोवती चक्राकार आणि जमिनीस समांतर अशी फिरविल्या जाते. आवश्यक वेग आल्यावर मग त्यातील एक दोरी सोडल्या जाते.त्यामुळे दगड वेगाने सुटतो आणि हवा तेथे जाऊन पडतो. दगड कुठे जाऊन पडावा वा कुठे लागावा यासाठी कौशल्याची गरज असते.