गोपीनाथ तळवलकर
गोपीनाथ गणेश तळवलकर (जन्म : २९ नोव्हेंबर १९०७; - ७ जून]२०००) हे मुलांच्या आनंद मासिकाचे संपादक व एक ख्यातनाम बालसाहित्यिक होते. प्रौढ साक्षरांसाठीही त्यांनी लिखाण केले. कणिका, खंडकाव्य, बालकविता असे विविध काव्यप्रकार हाताळूनही त्यांचे नाव झाले नाही. आकाशमंदिर, छायाप्रकाश, नंदिता या कादंबऱ्या, ज्ञानेश्वरीतील सौंदर्यविश्व हे रसग्रहण, तसेच मुलांसाठीची अनेक पुस्तके त्यांनी लिहिली होती. त्यांचे काही लिखाण ’गोपीनाथ’ या टोपणनावाने केलेले आहे.
आकाशवाणीवरील बालप्रिय बालोद्यान या कार्यक्रमातील नाना म्हणजेच गोपीनाथ तळवलकर. तळवलकर हे पुणे केंद्रावर बालविभागप्रमुख होते. बालोद्यान हा मुलांचा कार्यक्रम ते आयोजत. दर रविवारी सकाळी दहा वाजता बालगोपाळांच्या गच्च उपस्थितीत हा कार्यक्रम होत असे. यास स्टुडियोचे दार जेमतेम बंद करता येण्याइतकी गर्दी होत असत.
आनंद मासिक
आनंद हे मासिक १९०६ साली वासुदेव गोविंद आपटे यांनी सुरू केले, आपट्यांनंतर गोपीनाथ तळवलकर व नंतर संपादिका श्यामला शिरोळकर यांच्या संपादकत्वाखाली या मासिकाची वाटचाल चालू राहिली. गोपीनाथ तळवलकर हे ३५ वर्षे या मासिकाचे संपादक होते.
निवडक पुस्तके
- अनुराधा :- हे पुस्तक [१][permanent dead link] येथे वाचता येते.
- आकाशमंदिर (कादंबरी)
- आनंदभुवन
- आशियाचे धर्मदीप
- चंदाराणी (बालसाहित्य)
- छायाप्रकाश (कादंबरी)
- तव चरणी ही अञ्जली
- दुर्वांकुर
- नंदिता (कादंबरी)
- मराठी शब्द रत्नाकर
- लिंबोणीच्या झाडाखाली (बालसाहित्य)
- वसंत सेवा
- शांतिनिकेतन
- ज्ञानेश्वरीतील सौंदर्यविश्व (रसग्रहणात्मक पुस्तक)
आत्मचरित्र
- सहस्रधारा : या आत्मचरित्रात आत्मगौरव, आत्मसमर्थन, अहंकार यांचा स्पर्शही नाही. या सहस्रधारा लेखकाच्या ॠजू व्यक्तिमत्त्वासारख्याच सौम्य, शीतल प्रवाहाने नटलेल्या आहेत