गॅल्व्हस्टन (टेक्सास)
गॅल्व्हस्टन Galveston | ||
अमेरिकामधील शहर | ||
| ||
गॅल्व्हस्टन | ||
गॅल्व्हस्टन | ||
देश | अमेरिका | |
राज्य | टेक्सास | |
स्थापना वर्ष | इ.स. १८३९ | |
क्षेत्रफळ | ५३९.६ चौ. किमी (२०८.३ चौ. मैल) | |
समुद्रसपाटीपासुन उंची | ७ फूट (२.१ मी) | |
लोकसंख्या | ||
- शहर | ४७,७६२ | |
- घनता | ७४६ /चौ. किमी (१,९३० /चौ. मैल) | |
http://www.cityofgalveston.org |
गॅल्व्हस्टन (इंग्लिश: Galveston) हे अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील ह्युस्टन या महानगराजवळचे शहर आहे. हे शहर टेक्सासच्या आग्नेय भागात गॅल्व्हस्टन ह्याच नावाच्या मेक्सिकोच्या आखातामधील बेटावर वसले असून ते अमेरिकेमधील सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक आहे.
२०१२ च्या अंदाजानुसार या शहराची लोकसंख्या ४७,७६२ आहे. याला ह्युस्टन-शुगरलॅंड महानगराचा भाग समजले जाते.
गॅल्व्हस्टन बंदर
गॅल्व्हस्टन बंदर १८२५मध्ये बांधण्यात आले. गॅल्व्हस्टन द्वीपाच्या उत्तर भागात व पेलिकन द्वीपावर सुविधा असलेल्या या बंदरातून खनिज तेलासह अनेक प्रकारच्या मालसामानाची वाहतूक होते. येथून कॅरिबियन समुद्रामध्ये जाणाऱ्या क्रुझनौकांसाठी वेगळा धक्का आहे. येथे कार्निव्हल क्रुझ लाइन्सच्या कार्निव्हल कॉन्क्वेस्ट, कार्निव्हल एक्सटसी, कार्निव्हल मॅजिक, कार्निव्हल फ्रीडम आणि कार्निव्हल ट्रायम्फ, रॉयल कॅरिबियन इंटरनॅशनलची एमएस लिबर्टी ऑफ द सीझ तसेच डिस्नी क्रुझ लाइनची डिस्नी मॅजिक या नौकांचे मुख्य बंदर आहे.
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ
- स्वागत कक्ष
- विकिव्हॉयेज वरील गॅल्व्हस्टन पर्यटन गाईड (इंग्रजी)