गॅमा किरण
गॅमा प्रारण किंवा गॅमा किरण (इंग्रजी: Gamma Radiation or Gamma Ray; गॅमा रेडिएशन ऑर गॅमा रे) हे अतिशय उच्च वारंवारतेचे विद्युतचुंबकीय प्रारण आहे. त्याच्यामध्ये उच्च ऊर्जेचे फोटॉन असतात. गॅमा प्रारण किंवा गॅमा किरण हे गॅमा (γ) या ग्रीक मुळाक्षराने दर्शवले जातात.