Jump to content

गृहोपयोगी उपकरणे


स्नानाचे पाणी तापविणे, चहा-कॉफी वगैरे गरम पेये बनविणे, पावाचे तुकडे भाजणे, स्वयंपाकाचे साहित्य तयार करणे, अन्न शिजविणे, भांडी घासणे, कपडे धुणे, कपड्यांना इस्त्री करणे, केर काढणे अशी घरगुती कामे करताना उपयोगी पडणाऱ्या साधनांचा गृहोपयोगी उपकरणांत समावेश होत.

स्नानाचे पाणी तापविण्यासाठी भारतामध्ये अनेक ठिकाणी लाकडाच्या ढलप्या जाळून उष्णता उत्पन्न करणारे बंब वापरतात. अशा बंबांचे दोन प्रकार आ. १ मध्ये दाखविले आहेत. हे बंब पाण्याने भरल्यावर धुराड्याच्या तोंडातून लाकडाच्या ढलप्या आत टाकतात. त्या मधल्या नळातून खालच्या


झाऱ्यावर पडतात. गरम झालेले पाणी बाहेर काढण्यासाठी (अ) या प्रकारात बंबाच्या खालच्या बाजूस एक तोटी असते. या तोटीतून आतील सर्व पाणी बाहेर काढता येते. सर्व गरम पाणी बाहेर काढल्यावर बंबात पुन्हा थंड पाणी भरले नाही, तर उष्णता फुकट जाते व बंबाच्या पत्र्याचेही नुकसान होते.

या नळीचे वरचे तोंड पाणी भरण्याच्या तोंडाच्या थोडे खाली ठेवलेले असते. थंड पाणी आत सोडले म्हणजे पाण्याची पातळी वाढते व गरम पाणी नळीतून बाहेर येते. या पद्धतीने जितके थंड पाणी आत टाकावे तितकेच गरम पाणी बाहेर पडते व बाकीचे गरम पाणी बंबात शिल्लक राहते आणि बंब रिकामा होत नाही. हे दोन्ही प्रकारचे बंब २० ते ८० लि. पाणी ठेवण्यासाठी बनवितात. आ. १ (अ) मध्ये दाखविलेला बंब तांब्याच्या पत्र्यापासून बनवितात, त्यामुळे तो गंजत नाही व कित्येक वर्षे चांगले काम देतो. याचे सांधे झाळ देऊन पक्के केलेले असतात.

त्याच्यावर उष्णताविनियमक (गरम वायूतील उष्णता पाण्याला देणारा) भाग असतो. त्याच्या मदतीने ज्वलनाची बहुतेक सर्व उष्णता सभोवतालच्या पाणी भरलेल्या नळकांड्यात जाते व तेथील पाणी तापते. तापलेले पाणी वरच्या बाजूकडे चढते व बाहेर पडते. गरम पाण्याची तोटी उघडल्याशिवाय वायूज्वालक चालू होऊ नये म्हणून एक विशेष योजना बसविलेली असते.