गुलाग
गुलाग तथा ग्लाव्हनोई उप्राव्लेनी लागेरै (रशियन: ГУЛАГ; Главное управление лагерей; छावण्यांचे महानिदेशन[१][२][३]) ही सोव्हिएत संघातील सरकारी वेठबिगारी छावण्या व तुरुंगांचे व्यवस्थापन करणारी संस्था होती. अशा छावण्यांनाही गुलाग म्हणून संबोधले जाते.[४]
या छावण्यांची सुरुवात व्लादिमिर लेनिनच्या सत्ताकाळात सुरू झाली व जोसेफ स्टालिनच्या राजवटीत यांची संख्या सर्वाधिक होती.[५] या छावण्यांचा उपयोग साम्यवादी सरकारविरुद्ध आवाज उठविणाऱ्यांना डांबून ठेवण्यासाठी केला गेला होता. भुरट्या चोरांपासून राजकीय विरोधक व दरोडे-खून करणाऱ्यांना झटपट खटले चालवून अशा छावण्यांमध्ये पाठविले जात असे. हे खटले अनेकदा न्यायालया ऐवजी साम्यवादी सरकारच्या अधिकाऱ्यांच्या समोर चालत असे व त्याला अपील[मराठी शब्द सुचवा] करण्याची सोय नसे.
रशियन लेखक अलेक्झांडर सोल्झेनित्सिन याने अशा एका छावणीत आठ वर्षे काढल्यानंतर गुलाग आर्चिपेलागो (गुलागांचा द्वीपसमूह) हे पुस्तक १९७३मध्ये प्रकाशित केले. नोबेल पारितोषिक मिळालेल्या या पुस्तकात गुलागांमध्ये मरेपर्यंत काम केलेल्या लोकांचे वर्णन आहे.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Introduction: Stalin’s Gulag." GULAG: Soviet Labor Camps and the Struggle for Freedom. US: Center for History and New Media, George Mason University. Retrieved 23 June 2020.
- ^ "Gulag." History.com. A&E Networks. 2018. Retrieved 23 June 2020.
- ^ Applebaum, Anne. Gulag: A History. Doubleday, 2003, pp. 50.
- ^ Remnick, David (April 14, 2003). "Seasons in Hell". The New Yorker. March 27, 2017 रोजी पाहिले.
- ^ Applebaum, Anne. 2017. "Gulag: An Introduction." Victims of Communism. Archived from the original on September 5, 2017.