Jump to content

गुलजार

Gulzar (es); Gulzar (hu); ગુલઝાર (gu); Gulzar (ast); Гулзар (ru); गुलजार (mai); Gulzar (ga); Գուլզար (hy); 古勒扎尔 (zh); Gulzar (da); Gulzar (tr); ガルザー (ja); Gulzar (mg); Gulzar (sv); 古勒扎爾 (zh-hant); गुलज़ार (hi); గుల్జార్ (te); Gulzar (fi); গুলজাৰ (as); Gulzar (eo); குல்சார் (ta); Gulzar (it); গুলজার (bn); Gulzar (fr); 굴자르 (ko); Gulzar (de); Gulzar (ms); Gulzar (sq); گلزار (fa); गुलजार (mr); ಗುಲ್ಜಾರ್ (kn); ଗୁଲଜାର (or); ਗੁਲਜ਼ਾਰ (pa); 古勒扎尔 (zh-cn); گلزار (pnb); गुलज़ार (awa); Gulzar (sl); ഗുൽസാർ (ml); Gulzar (pt-br); Gulzar (sco); Gulzar (id); Gulzar (nn); Gulzar (nb); Gulzar (nl); Gulzar (ca); Gulzar (pt); گلزار (sd); جولزار (arz); Gulzar (en); غولزار (ar); 古勒扎尔 (zh-hans); گلزار (ur) poeta y directo de cine indio (es); ভারতীয় কবি, গীতিকার ও চলচ্চিত্র পরিচালক (bn); cinéaste et homme de lettres indien (fr); ઉર્દૂ શાયર, ગીતકાર તથા ફિલ્મ નિર્દેશક (gu); ލިޔުންތެރިއެއް (dv); индийский поэт, сценарист и режиссёр (ru); कवी, गीतकार, हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते (mr); cyfarwyddwr ffilm, cynhyrchydd a sgriptiwr ffilm a aned yn Dina yn 1934 (cy); ଗୀତିକାର, ନିର୍ଦ୍ଦେଶକ, ପ୍ରଯୋଜକ (or); فیلمنامه‌نویس، تهیه‌کننده، نویسنده، شاعر، و کارگردان هندی (fa); ساہتیہ اکادمی اعزاز یافتہ مصنف (ur); Pengarang Urdu (id); ഇന്ത്യന്‍ എഴുത്തുകാരന്‍ (ml); Indiaas filmregisseur (nl); indischer Dichter, Liedtexter, Drehbuch- und Dialogautor, Filmregisseur und Filmproduzent (de); गीतकार एवं उर्दू शायर (hi); గీత రచయిత, సినిమా దర్శకుడు (te); ਭਾਰਤੀ ਕਵੀ, ਗੀਤਕਾਰ ਅਤੇ ਫ਼ਿਲਮ ਨਿਰਦੇਸ਼ਕ (pa); Indian poet, lyricist and author (born 1934) (en); ಭಾರತದ ಕವಿ (kn); هندستاني شاعر، گيتڪار ۽ فلم ڊائريڪٽر (sd); சாகித்திய அகாதமி விருது பெற்ற உருது எழுத்தாளர் (ta) সম্পুরণ সিং কালরা (bn); Sampooran Singh Gulzar (fr); સમ્પૂરન સિંહ કાલરા (gu); Сампуран Сингх Калра (ru); गुलझार, संपूर्ण सिंग, संपुर्ण सिंग, संपूर्णसिंग कालरा, गुलज़ार, संपूर्णसिंग, संपुर्णसिंग (mr); Sampooran Singh Gulzar (de); 古尔扎, 古勒扎爾, 桑普兰·辛格·卡尔拉 (zh); Sampooran Singh Kalra (tr); ガルザール, グルザール (ja); 古爾扎 (zh-hant); सम्पूरन सिंह गुलज़ार, सम्पूर्ण सिंह कालरा (hi); సంపూర్ణ సింహ గులజార్, సంపూర్ణ సింగ కాలరా (te); ਸਮਪੂਰਨ ਸਿੰਘ ਕਾਲਰਾ (pa); Sampooran Singh Kalra (en); سمپورن سنگھ گلزار (ur); 古尔扎 (zh-hans); سمپورن سنگهه ڪالرا (sd)
गुलजार 
कवी, गीतकार, हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
स्थानिक भाषेतील नावگلزار
जन्म तारीखऑगस्ट १८, इ.स. १९३४
Dina
टोपणनाव
  • Gulzar
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. १९७१
नागरिकत्व
व्यवसाय
अपत्य
वैवाहिक जोडीदार
उल्लेखनीय कार्य
  • Jai Ho (संगीतकार)
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

+गुलजार यांचे खरे नाव संपूर्णसिंह कालरा आहे. भारतातील एक कवी, गीतकार, हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते अश्या बहुमुखी प्रतिभेचे धनी गुलज़ार यांचा जन्म ऑगस्ट १८, १९३६ रोजी पंजाबमधील दीना येथे झाला. हे ठिकाण सध्या पाकिस्तानात आहे. [१]

बालपण

गुलजार यांना लहानपणापासून गीतांच्या भेंड्यांमध्ये भाग घ्यायला आवडत असे. त्यावरून त्यांना पुढे कविता व नंतर उत्तर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात रस वाटू लागला. ते शेजाऱ्यांकडे जाऊन तंतुवाद्य वाजविण्याचा अभ्यास करीत. गुलजार जेव्हा महाविद्यालयात गेले तेव्हा ते नियमितपणे रविशंकर आणि अली अकबर खान यांच्यासारख्यांच्या वाद्यसंगीताच्या कार्यक्रमांना जाऊ लागले.

फाळणीनंतर

हिंदुस्तानची फाळणी झाल्यानंतर गुलजार यांचे कुटुंब फार वर्षे पाकिस्तानात राहू शकले नाही. ती मंडळी भारतात अमृतसरला आली आणि गुलजार मुंबईला. इथे ते एका मोटार गॅरेजमध्ये काम करू लागले, मुंबईत त्यांना हिंदी चित्रपटांचे आकर्षण वाटू लागले. फावल्या वेळात ते कविता करत. बिमल रॉय, हृषीकेश मुखर्जी आणि हेमंत कुमार यांना भेटून ते आपल्या कविता वाचून दाखवू लागले. परिणामी बंदिनी चित्रपटासाठी गुलजार यांनी ’मोरा अंग अंग लै ले, मुझे श्यामरंग दै दे’ हे गाणे लिहिले आणि ते बिमल रॉय यांचे पूर्णवेळचे असिस्टंट झाले. ते गाणे अतिशय लोकप्रिय झाले आणि गुलजार यांना जिकडे तिकडे गीतलेखनासाठी बोलावणी येऊ लागली.

नंतरच्या काळात गुलजार यांनी हृषीकेश मुखर्जी, असित सेन यांच्या चित्रपटांसाठीही गीते लिहिली.

गुलज़ार यांची गीतशैली

गुलज़ार हे हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या विशिष्ट शब्दशैलीसाठी ओळखले जातात. ज्या सामान्यतः गीतांमध्ये वापरल्या जात नाहीत, अश्या प्रतिमा गुलज़ार यांच्या गीतांमध्ये ठिकठिकाणी वापरलेल्या आढळतात.

उदाहरण म्हणून काही गीते :

  • ”सत्या” चित्रपटील अतिशय लोकप्रिय गीत- "सपने में मिलती हैं!" हे गीत नावीन्यपूर्ण प्रतिमा वापरून अगदी हृदयंगम झाले आहे.

सारा दिन सडकों पे खाली रिक्षे सा पीछे पीछे फिरता हैं ।

  • बंटी और बबली मधील

ऑंखें भी कमाल करती हैं पर्सनल से सवाल करती हैं. हे फक्त काही नमुने. गुलज़ार यांचे प्रत्येक गीत अशा प्रतिमांनी पुरेपूर असते.

  • ओंकारामधील बीडी आणि नमक इश्क़ का

गुलज़ार-एक गीतकार

गुलज़ार यांनी पुढील चित्रपटांसाठी गीते लिहिली आहेत.

  • आनंद (१९७०)
  • ओंकारा(२००६)
  • खामोशी (१९६९)
  • गुड्डी (१९७१)
  • जान-ए-मन(२००६)
  • थोडीसी बेवफाई
  • दो दूनी चार (१९६८)
  • नमकहराम (१९७३)
  • बंटी और बबली(२००५)
  • बावर्ची (१९७२)
  • सफर (१९७०)

गुलजार यांनी निर्माण केलेले चित्रपट

  • अंगूर (१९८१)
  • अचानक (१९७३)
  • ऑंधी (१९७५)
  • किनारा (१९७७)
  • कोशिश (१९७२)
  • खुशबू (१९७५)
  • नमकीन (१९८२)
  • परिचय (१९७२)
  • मीरा (१९७९)
  • मेरे अपने (१९७१)
  • मौसम (१९७५)
  • लेकिन (१९९०)

गुलजार यांची पुस्तके

  • बोस्की (कवितासंग्रह)
  • तक़सीम (हिंदी कथासंग्रह)
  • देवडी (मूळ हिंदी कथासंग्रहाचा मराठी अनुवाद-अनुवादक अंबरीश मिश्र)
  • धुऑं ( हिंदी कथासंग्रह)
  • मिर्झा गालिब (मराठी अनुवाद - अंबरीश मिश्र)

गुलजार यांना मिळालेले पुरस्कार

  • साहित्य अकादमी पुरस्कार २००२ मध्ये धुऑं या कथासंग्रहासाठी
  • पद्मभूषण पुरस्कार २००४ मध्ये
  • ऑस्कर पुरस्कार जय हो या स्लमडॉग मिलेनिअर या गीताच्या लेखनासाठी
  • दादासाहेब फाळके पुरस्कार (२०१३)
  • 2023 सालचा 58 वा ज्ञानपीठ पुरस्कार गुलजार यांना उर्दूसाठी प्रदान करण्यात आला आहे. (२०२४ मध्ये)

(अपूर्ण)