गुरुपुष्यामृत योग
ज्या गुरुवारी चंद्र पुष्य नक्षत्रात असतो त्या दिवशी गुरुपुष्य योग (किंवा गुरुपुष्यामृत योग) असतो. या दिवशी नवीन वाहन, नवीन वस्तू आणि विशेषतः सोने-चांदी खरेदी केल्यास ती खरेदी लाभदायक ठरते असे हिंदू शास्त्र सांगते. असा गुरुपुष्य योग वर्षातून दो-चार वेळेलाच येतो म्हणून त्याची अपूर्वाई असते. या दिवशी सोनारांच्या दुकानांत सोने खरेदीसाठी खूप गर्दी होते[१][२][३].
महाराष्ट्राबाहेर रवि-पुष्य योगाचे असेच महत्त्व असते. सन २०१८ चे गुरुपुष्य योग असलेले दिवस : ९ ऑगस्ट, ६ सप्टेंबर आणि ४ ऑक्टोबर.
सन २०१९ चे गुरुपुष्य योग असलेले दिवस : ६ जून, ४ जुलै आणि १ ऑगस्ट
सन २०२० चे गुरुपुष्य योग असलेले दिवस : २ एप्रिल, ३० एप्रिल, २८ मे आणि ३१ डिसेंबर. सन २०२१ चे गुरुपुष्य योग असलेले दिवस : २८ जानेवारी, २५ फेब्रुवारी, ३० सप्टेंबर, २८ ऑक्टोबर आणि २५ नोव्हेंबर. यावरून असे दिसते की पहिले दोन किंवा तीन गुरुपुष्य योग लागोपाठ येतात आणि नंतरचा ७-८ महिन्यांनी येतो.
संदर्भ
- ^ "Guru Pushya Yoga 2020 : शुभ संयोग के साथ एप्रिल की विदाई, मई से उम्मीद बाकी". नवभारत टाइम्स (हिंदी भाषेत). 26 मे 2020 रोजी पाहिले.
- ^ "गुरु-पुष्य नक्षत्र : सभी कार्य में सफलता दिलाएंगे यह 5 मंत्र..." hindi.webdunia.com (हिंदी भाषेत). 26 मे 2020 रोजी पाहिले.
- ^ Khan, Aabid. "27 मई हर तरह के कार्यों के लिए शुभ क्योंकि इस दिन गुरुपुष्य योग, 27 नक्षत्रों में यह आठवां और सर्वश्रेष्ठ". दैनिक भास्कर (हिंदी भाषेत). 26 मे 2020 रोजी पाहिले.