Jump to content

गुडघे

गुडघे हे रत्‍नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील गाव आहे. साहित्यिक गोनिदा तथा गो. नी. दांडेकर यांचे हे गाव आहे.

  ?गुडघे

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
Map

१७° ३५′ १६.३″ N, ७३° १३′ ५८.४″ E

प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरदापोली, दाभोळ
जिल्हारत्नागिरी
तालुका/केदापोली
भाषामराठी
सरपंच
ग्रामपंचायतगुडघे
कोड
पिन कोड
• आरटीओ कोड

• ४१५७०६
• एमएच-०८
संकेतस्थळ: ग्रुप ग्रामपंचायत गुडघे
राकेश टेमकर द्वारा निर्मित
ग्रामदेवता सातमाई देवीचे मंदिर

शिक्षण

या गावात जिल्हा परिषदेची एक प्राथमिक मराठी शाळा आहे. बहुतेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी दापोलीला किंवा मुंबईला जातात.

हवामान

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

खेळ

गुडघे गावात क्रिकेट हा अतिशय लोकप्रिय खेळ मानला जातो. याव्यतिरिक्त, खो-खो आणि कबड्डी हे खेळ देखील शालेय स्तरावर खेळले जातात.

बाह्य दुवे

ग्रुप ग्रामपंचायत गुडघे[permanent dead link]