गुजरात संपर्क क्रांती एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. संपर्क क्रांती ह्या विशेष गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे अहमदाबादच्या अहमदाबाद रेल्वे स्थानक ते दिल्लीमधीलहजरत निजामुद्दीन स्थानकांदरम्यान आठवड्यातून तीनदा धावते. पश्चिम रेल्वेमार्गे धावणाऱ्या गुजरात संपर्क क्रांती एक्सप्रेसला अहमदाबाद ते दिल्ली दरम्यानचे १०८५ किमी अंतर पार करायला १७ तास व २० मिनिटे लागतात.