Jump to content

गुजरात एक्सप्रेस

गुजरात एक्सप्रेसचा फलक
गुजरात एक्सप्रेसचा मार्ग

गुजरात एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक प्रवासी सेवा आहे. पश्चिम रेल्वेद्वारे चालवली जात असलेली ही रेल्वे मुंबईला गुजरातची आर्थिक राजधानी अहमदाबाद शहरासोबत जोडते. ही गाडी मुंबई सेंट्रल व अहमदाबाद स्थानकांदरम्यान रोज धावते व मुंबई ते अहमदाबाद दरम्यानचे ४९३ किमी अंतर ९ तास व १५ मिनिटांत पूर्ण करते. गुजरात एक्सप्रेस गाडीमध्ये केवळ दुय्यम श्रेणीचे आसनकक्ष व वातानुकूलित चेअर कार हे दोनच प्रकारचे डबे असून तिला शयनयान (sleeper) डबे जोडले जात नाहीत. मुंबई व अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या व केवळ खुर्चीयान असलेल्या एकूण ४ गाड्यांपैकी गुजरात एक्सप्रेस ही एक असून कर्णावती एक्सप्रेस, मुंबई अहमदाबाद शताब्दी एक्सप्रेस व मुंबई अहमदाबाद डबल डेकर एक्सप्रेस ह्या इतर तीन गाड्या आहेत.

मुंबई ते अहमदाबाद दरम्यानचा रेल्वेमार्ग विद्युत असल्यामुळे डब्ल्यू.ए.पी.-४ हे विद्युत इंजिन गुजरात एक्सप्रेसची वाहतूक करते.

तपशील

वेळापत्रक

गाडी क्रमांक मार्ग प्रस्थान आगमन कधी
१९०११मुंबई सेंट्रल – अहमदाबाद०५:४५१५:००रोज
१९०१२अहमदाबाद – मुंबई सेंट्रल०७:००१६:२५रोज

मार्ग

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे