गीतिका जाखड
गीतिका जाखड ही एक भारतीय पहिलवान आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे सर्वोत्तम कुस्तीगीरचे पदक आणि २००६ च्या व २०१४ च्या आशियाई खेळांमध्ये दोन वेळा भारतीय महिला कुस्तीगीरची पदके जिंकणारी ती एकमेव भारतीय महिला कुस्तीगीर आहे.[१] २००६मध्ये भारत सरकारने गीतिकाला अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले..[२]हरियाणा सरकारने तिला भीम पुरस्काराने गौरवून २००८ साली पोलीस उपाध्यक्ष म्हणून नियुक्त केले.
वैयक्तिक जीवन आणि कुटुंब
गीतिकाचे वडील सत्यवीर सिंह जाखड हे भारतातील हरियाणा राज्यातल्या हिसारमधील क्रीडा अधिकारी आहेत. त्यांनी व विद्यापीठाच्या कुलगुरूंनी गीतिकाला कुस्तीची प्रेरणा दिली.
गीतिकाचे सुरुवातीचे कारकीर्द
गीतिका ॲथलेटिक्सवर लक्ष केंद्रित करून सक्रियपणे शालेय स्तरावरच्या खेळांमध्ये सहभागी होत होती. पण तिला भावाच्या शिक्षणासाठी त्याच्या कुटुंबाचे मूळ गाव अग्रोहा सोडून हिसार येथे राहावे लागले. स्पर्धात्मकपणे ॲथलेटिक्सचा पाठपुरावा करण्यासाठी तिच्या वडिलांनी तिला हिसारच्या महावीर स्टेडियममध्ये नेले होते, परंतु तिथेही ती निराश झाली. त्यांतर ती जवळच्या कुस्तीगृहाकडे गेली. मोठ्या आवाजाचे चपळ तरुण कुस्तीचा सराव करणाऱ्या इतर मुलींना आकर्षक वाटत होते. गीतिका तेव्हाच कुस्तीच्या प्रेमात पडली आणि ऑक्टोबर १९९८मध्ये तिने ॲथलेटिक्स सोडून आपल्या खेळप्रकारासाठी कुस्तीची निवड केली.[३]
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Glasgow 2014 - Geetika Jakhar Profile". g2014results.thecgf.com (स्पॅनिश भाषेत). 2016-06-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-07-25 रोजी पाहिले.
- ^ "Indian grapplers sweep gold in Commonwealth Championship". Zee News (इंग्रजी भाषेत). 2005-07-02. 2018-07-25 रोजी पाहिले.
- ^ "The Hindu : Sport / Wrestling : Indian wrestlers win 10 medals". www.thehindu.com. 2018-07-25 रोजी पाहिले.