गीता मुखर्जी
गीता मुखर्जी (बंगाली : গীতা মুখর্জী) (जानेवारी ८, इ.स. १९२४ - मार्च ४, इ.स. २०००) या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या होत्या. त्या इ.स. १९८०, इ.स. १९८४, इ.स. १९८९, इ.स. १९९१, इ.स. १९९६, इ.स. १९९८ आणि इ.स. १९९९च्या लोकसभा निवडणुकींमध्ये पश्चिम बंगाल राज्यातील पंस्कुरा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या.