गिला नदी
गिला नदी ही अमेरिकेच्या न्यू मेक्सिको व ॲरिझोना राज्यांमधून वाहणारी एक नदी कॉलोराडो नदीची उपनदी आहे. ही नदी न्यू मेक्सिकोच्या पश्चिम भागात उगम पावते व प्रामुख्याने पश्चिमेकडे १,०४४ किलोमीटर (६४९ मैल) वाहत जाऊन ॲरिझोनामधील युमा शहराजवळ कॉलोराडो नदीला मिळते. गिलाचे पाणलोट क्षेत्र अमेरिका तसेच उत्तर मेक्सिकोपर्यंत पसरले असून सोनोराच्या वाळवंटामधील रूक्ष भूभागाला गिलामुळे पाणी लाभले आहे.
गिला नदी फीनिक्स महानगराच्या दक्षिणेकडून वाहते.
बाह्य दुवे
- गिला नदी पर्यटन Archived 2011-01-28 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत