Jump to content

गिरोलामो साव्होनारोला

गिरोलामो साव्होनारोला

जिरोलामो साव्होनारोला (इटालियन: Girolamo Savonarola; २१ सप्टेंबर, इ.स. १४५२:फेरारा - २३ मे, इ.स. १४९८:फ्लोरेन्स) हा डॉमिनिकन समुदायाचा एक अनुयायी व रानिसां काळातील एक इटालियन धर्मप्रसारक होता. साव्होनारोलाने रोमन कॅथलिक चर्चमधील भ्रष्टाचार, गरिबांचे शोषण इत्यादी सामाजिक समस्यांवर कडाडून टीका केली व स्वतःला भविष्यवादी घोषित केले.

पोप अलेक्झांडर सहाव्याने साव्होनारोलाला भेटीचे आमंत्रण दिले असतानाही त्याने पोपचा अवमान केला व चर्चविरुद्ध चळवळी सुरू केल्या. ह्यावरून खवळून उठलेल्या पोपने त्याला शिक्षा ठोठावली व २३ मे १४९८ रोजी साव्होनारोला व त्याच्या दोन सहकाऱ्यांना फाशी देण्यात आले.