गिरोलँडो गाय
गिरोलँडो हा एक ब्राझील मधील दुधारू गोवंश असून हा भारतातील गीर आणि मूळचा नेदरलँड्सच्या होल्स्टीन गोवांशाचा संकर आहे. हा गोवंश उष्ण तापमान आणि उष्णकटिबंधीय रोगांना उत्तम प्रतिरोधक आहे.[१] या गोवंशाचा रंग काळा किंवा काळसर पांढरा असतो. ब्राझील मधील सुमारे ८०% दूध उत्पादन गिरोलँडो गायीपासून प्राप्त होते. गिरोलँडो ही ३/८ गीर आणि ५/८ होल्स्टीन आहे.
ब्राझील मध्ये पहिल्या गिरोलँडोची उत्पत्ती १९४० साली झाली. १९४० च्या सुमारास ब्राझिलियन शेतकऱ्यांनी डच पशुंसोबत गीर गायीचे संकर करण्यास सुरुवात केली. यातून 'प्रोग्राम गिरोलँडो' नावाच्या सरकारी प्रकल्पाच्या सुधारणेच्या प्रयत्नांमुळे या जातीचे उत्पादन आणि लोकप्रियता वाढली. १९८९ मध्ये ब्राझीलच्या कृषी मंत्रालयाने काही संघटनांच्या सहकार्याने गिरोलँडोच्या प्रजननासाठी ५/८ होल्स्टीन आणि ३/८ गीर असे मानक तयार केले.[२]
वैशिष्ट्ये
गिरोलँडो प्रजातीला होलस्टिन आणि गीर दोन्हीच्या संकर मधुन विशिष्ट रंग आणि गुणधर्म प्राप्त झालेत. हा गोवंश काळ्या किंवा काळसर पांढऱ्या रंगाचा असून संकरातील दोन्हीच्या टक्केवारीनुसार रंगात विविधता आढळते. या गोवंशाचे कान गीरसारखे मोठे असतात.[२]
गिरोलँडो गायीमध्ये उष्ण कटिबंधातील उत्पादनासाठी योग्य शारीरिक आणि आकारशास्त्रीय वैशिष्ट्ये निर्माण झाली आहेत. जसेकी कासेची क्षमता आणि आधार, स्तनाग्रांचा आकार, दुधातील घटक, रंगद्रव्य, थर्मो-रेग्युलेटरी क्षमता, मजबूत पाय आणि खुर, चाऱ्याची विविधता, पुनरुत्पादक कार्यक्षमता इत्यादी. गिरोलँडो जातीची वासरे ३० महिन्यांपासून प्रजोत्पादन करण्यास सुरुवात करतात. दुग्धोत्पादनाचे आयुर्मान १० वर्षांपर्यंत असून ते सुमारे १५ वर्षांपर्यंत चालू रहाते. दोन वेतातील अंतर सुमारे ४१० दिवस असते. ३०५ दिवसात प्रति दुग्धोत्पादन सरासरी ३,६०० किलो (दोन वेळचे मिळून) प्राप्त होते. यातील स्निग्धांश ४% असून, २०,००० किलोपेक्षा जास्त दुधाचे उत्पादन एका जनावरापासून मिळते.[२]
या गोवंशाच्या बैलात पुढील गुणधर्म दिसून येतात - कार्यक्षम चारा, रोग आणि कीटकांचा प्रतिकार, वजन वाढण्याची गती, प्रजननामध्ये समान परिस्थितीत ठेवल्यास मांसासाठी कोणत्याही विशिष्ट औद्योगिक क्रॉसिंगशी तुलना करता येते. चाचण्यांमध्ये असे दिसून आले आहे की प्रतिदिन सरासरी १ किलो पर्यंत वजनात वाढ दिसून येते.[२]
इतर देशात
टांझानिया
युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय अर्बाना-शॅम्पेन मधील प्राणी शास्त्रज्ञांची एक टीम टांझानियामधील सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी तेथील स्थानिक गायी पेक्षा २० पट जास्त दूध देणाऱ्या या गायीचे तेथे वितरण, संगोपन आणि संवर्धन करण्याच्या तयारीत आहे. टांझानियामधील मूळ गोवंश अर्धा लिटर दूध देतो. याउलट हा संकर झाल्यास दुध देण्याचे प्रमाण १० लिटर पर्यंत वाढू शकते. त्यासाठी टांझानियाला ५०% संकर असलेल्या होल्स्टीन-गिर किंवा जर्सी-गियर गोवंशाचे भ्रूण तेथील १०० देशी गुरांमध्ये रोपण करण्यास सुरुवात झाली आहे.[३]
भारत
भारतातील आनंद डेअरी गिरोलँडो या ब्राझिलियन गिरचे भ्रूण खरेदी करत आहे. ब्राझिलियन वळू द्वारे संकर घडवून राज्यातील शेतकऱ्यांना अधिक आणि चांगल्या दर्जाच्या दुधाचे उत्पादन करता येईल असा त्यामागील हेतू आहे. ब्राझिलियन संकरित गिर १ स्तनपानामध्ये १०,००० लिटर दूध देते. याउलट भारतीय गीर केवळ २,००० लिटर दूध देते. गीर ही केवळ भारतातच नाही तर यूएसए, मेक्सिको आणि व्हेनेझुएला सारख्या देशांसह परदेशातही लोकप्रिय आहे. यूपीने देखील एक योजना सुरू केली आहे ज्यामध्ये ते राज्याच्या सीमा ओलांडून देशी वाणांच्या आयातीवर सबसिडी देते.[४]
पंजाब मधील पटियाला येथील "सेंटर फॉर एक्सलंस ॲनिमल ब्रीडिंग" येथे २०१८-१९ पासून भारतीय गीर आणि ब्राझील मधील गिरोलँडो गायीचे यशस्वी संकर करून नवीन गोवंश करण्यात आला आहे. याद्वारे पुढील दहा वर्षात पंजाबचे दुग्धोत्पदान दुप्पट करण्याचे ध्येय आखण्यात आले आहे.[५]
संदर्भ
- ^ "Research on determining breed history by genetic markers". 2012-02-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-04-06 रोजी पाहिले.
- ^ a b c d "Girolando". thecattlesite.com. १४ मे २०११ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १५ मार्च २०२४ रोजी पाहिले.
- ^ "Climate-smart cows could deliver 10-20x more milk in Global South". aces.illinois.edu. १५ मार्च २०२४ रोजी पाहिले.
- ^ "UP to get Gujarat's Gir cows via Brazil". टाइम्स ऑफ इंडिया. १५ मार्च २०२४ रोजी पाहिले. Text " Lucknow News - Times of India " ignored (सहाय्य)
- ^ "इस नस्ल की गाय एक बार में देती है 40 से 45 लीटर दूध, रखरखाव में भी खर्चा कम, गर्मियों में भी कम नहीं होता इनका दूध". दैनिक भास्कर. १५ मार्च २०२४ रोजी पाहिले.