Jump to content

गिरिजा नदी

गिरीजा नदी
उगम म्हैसमाळ
पाणलोट क्षेत्रामधील देशछत्रपती संभाजीनगर जिल्हा, महाराष्ट्र

गिरीजा नदी ही महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक नदी आहे.

ती दक्षिण पूर्णा नदीची उपनदी आहे. गिरीजा नदीचा उगम म्हैसमाळ येथे होतो. ही नदी पुढे खुलताबाद तालुक्यातून वाहते. या नदीवर येसगाव खुलताबाद व वाकोद फुलंब्री याठिकाणी धरण, तलाव, प्रकल्प बनवण्यात आले आहेत. या नदीवर परिसरातील अनेक गावे अवलंबून असून गावांचा पिण्याचा व शेतीचा प्रश्न नदी भरल्याने सुटत असतो. फुलंब्री तालुका मधील वडोड बाजार, बोरगाव अर्ज, पडली व पुढे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात व इतर तालुक्यातून पुढे पूर्णा नदीला मिळते तसेच पुढे या नदीला पूर्णा याच नावाने ओळखले जाते पुढे वाहत जाते. तसेच ही नदी पुढे कटेस्वर या ठिकाणी गोदावरी नदी ला मिळते. या गिरिजा व पूर्णा नदीच्या तीरावर अनेक धार्मिक स्थळे प्रेक्षणीय आहेत. तसेच अनेक गावं व नगर या दोन नदीवर विसंबून आहेत. तसेच हजारो पूल या नदीवर बांधण्यात आलेले आहेत. त्यामुळे या नद्यांचं पाणी ठिकठिकाणी अडवलं जातं, त्यामुळे या नद्या बारमाही वाहत नाहीत. या फक्त पावसाळ्यात वाहतात. परंतु पूर्वी या नद्या बारमाही वाहत असत. गिरिजा व पूर्णा या गोदावरी नदी च्या उपनद्या आहेत. गोदावरी ही मराठवाड्याची जलवाहिनी व मुख्य नदी आहे. तिच्यावर छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड इत्यादी शहर पूर्णपणे विसंबून आहेत.गिरजा नदी जालना जिल्ह्यातील बोरगांव तारु या गावाजवळून वाहत जाते.या गावात सत्वाई देवी(सटवाई देवी) चे प्रसिद्ध मंदिर आहे.या देवीला सुमारे ३०० वर्षांचा इतिहास आहे.या देविचे प्रसिद्ध ठाणे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात देखील आहे.