गिरिजा देवी
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | ऑगस्ट ५, इ.स. १९२९, मे ८, इ.स. १९२९ वाराणसी | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | ऑक्टोबर २४, इ.स. २०१७ कोलकाता | ||
मृत्युची पद्धत |
| ||
मृत्युचे कारण | |||
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय | |||
पुरस्कार |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
गिरिजादेवी (जन्म : ८ मे, इ.स. १९२९; मृत्यू :कलकत्ता, २४ ऑक्टोबर २०१७) ह्या बनारस घराण्याचा वारसा चालविणाऱ्या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका होत्या.. त्या शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीत गायनासाठी, तसेच ठुमरीला अधिक समृद्ध स्थान देण्यासाठी विशेष ओळखल्या जात.
पूर्वायुष्य
गिरिजादेवींचा जन्म इ.स. १९२९ मध्ये भारतात वाराणसी येथे झाला. त्यांचे वडील रामदेव राय जमीनदार असून उत्तम हार्मोनियम वादक होते. त्यांच्याकडून गिरिजादेवींनी गाण्याचे प्राथमिक धडे घेतले. वयाच्या पाचव्या वर्षापासून गायक व सारंगी वादक सर्जूप्रसाद मिश्रा यांच्याकडून त्या ख्याल व टप्पा शिकल्या. श्रीचंद मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली आपले संगीत शिक्षण त्यांनी चालू असतानाच त्यांनी वयाच्या नवव्या वर्षी 'याद रहें' या हिंदी चित्रपटात भूमिका केली.
सांगीतिक कारकीर्द
गिरिजादेवींनी इ.स. १९४९ मध्ये अलाहाबाद आकाशवाणी केंद्रावर आपला पहिला संगीत कार्यक्रम केला. त्यांनी अशा प्रकारे बाहेरचे कार्यक्रम करण्यास त्यांच्या आई व आजीचा विरोध होता. तेव्हाच्या समजुतीनुसार उच्चवर्गीय स्त्रिया गाण्याचे सार्वजनिक कार्यक्रम करत नसत. गिरिजादेवींनी त्या कोणतेही खासगी संगीत कार्यक्रम करणार नाहीत हे मान्य केले. इ.स. १९५१ मध्ये बिहार प्रांतात त्यांनी आपला पहिला खुला संगीत कार्यक्रम सादर केला. इ.स. १९६० पर्यंत त्या आपले गुरू श्री चंद मिश्रा यांच्याकडे शिकत होत्या. इ.स. १९८० च्या दरम्यान त्यांनी कलकत्त्याच्या आय. टी. सी. संगीत संशोधन संस्थेत तर इ.स. १९९० च्या दरम्यान बनारस हिंदू विद्यापीठात अध्यापनाचे कार्य केले. आपला सांगीतिक वारसा जपण्यासाठी संगीत अध्यापन करून अनेक नवीन विद्यार्थ्यांना तयार करताना गिरिजादेवींनी इ.स. २००९ पर्यंत आपले संगीत दौरे चालू ठेवले होते.
गिरिजादेवी बनारस घराण्याच्या परंपरेत गात आणि त्या परंपरेतील पूरबी अंग शैलीच्या ठुमरीचे सादरीकरण करत. कजरी, चैता, चैती, घाटो, होरी, ख्याल गायकी, टप्पा, लोकसंगीत अशा विविधांगी शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन प्रकारांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्या विलंबित लयीतली, मध्य लयीतली किंवा द्रुत लयीताली अशा सर्वच प्रकारच्या ठुमऱ्या गात. बोल बनाव ठुमरी, बोल बांट ठुमरी याही प्रकारातल्या मुरकी आणि तिरकिट त्या सारख्याच ताकदीने सादर करीत.
गिरिजादेवी यांच्या प्रसिद्ध ठुमऱ्या
- कहनावा मानो
- चैत मासे चुनरी रंगायिलो हो राम
- नयन की मत मारो तलवारियॉं
- रस से भरे तोरे नैन
- रात हम देख ली
सन्मान व पुरस्कार
- इ.स. १९७२ मध्ये पद्मश्री पुरस्कार
- इ.स. १९८९ मध्ये पद्मभूषण पुरस्कार.
- इ.स. १९७७ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार
- इ.स. २०१० मध्ये संगीत नाटक अकादमी फेलोशिप
- इ.स. २०१६ मध्ये पद्मविभूषण पुरस्कार