गिनी-बिसाउ
गिनी-बिसाउ República da Guiné-Bissau गिनी-बिसाउचे प्रजासत्ताक | |||||
| |||||
ब्रीद वाक्य: Unidade, Luta, Progresso (पोर्तुगीज) | |||||
राष्ट्रगीत: Esta É a Nossa Pátria Bem Amada (ही माझी प्रिय मातृभूमी आहे) | |||||
गिनी-बिसाउचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी (व सर्वात मोठे शहर) | बिसाउ | ||||
अधिकृत भाषा | पोर्तुगीज | ||||
सरकार | प्रजासत्ताक | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- स्वातंत्र्य दिवस | २४ सप्टेंबर १९७३ (पोर्तुगालपासून) | ||||
- प्रजासत्ताक दिन | १० सप्टेंबर १९७४ | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | ३६,१२५ किमी२ (१३६वा क्रमांक) | ||||
- पाणी (%) | २२.४ | ||||
लोकसंख्या | |||||
-एकूण | १६,४७,००० (१४८वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}} {{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | ४४.१/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | १.९२५ अब्ज अमेरिकन डॉलर | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | १,११४ अमेरिकन डॉलर | ||||
मानवी विकास निर्देशांक . | ▼ ०.२८९ (कमी) (१६४ वा) (२००८) | ||||
राष्ट्रीय चलन | पश्चिम आफ्रिकन सीएफए फ्रॅंक | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | GW | ||||
आंतरजाल प्रत्यय | .gw | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | २४५ | ||||
गिनी-बिसाउचे प्रजासत्ताक (पोर्तुगीज: República da Guiné-Bissau) हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. गिनी-बिसाउच्या उत्तरेस सेनेगाल, दक्षिण व पूर्वेस गिनी तर पश्चिमेस अटलांटिक महासागर आहेत. बिसाउ ही ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
ऐतिहासिक काळात मालीच्या साम्राज्याचा भाग असणारा गिनी-बिसाउ १९व्या शतकापासून पोर्तुगीजांची एक वसाहत होता. १९७४ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ह्या देशाचे नाव गिनी ठेवण्यात आले व शेजारील गिनी देशापासून वेगळेपण राखण्यासाठी ह्या देशाच्या नावामध्ये बिसाउ हे राजधानीचे नाव जोडण्यात आले. स्वातंत्र्यानंतर गिनी-बिसाउचे राजकीय अस्तित्व अस्थिर राहिले आहे. लोकशाहीवादी सरकारे येथे सर्रास उलथवून टाकण्यात आली आहेत व लष्करी राजवट अनेकदा स्थापित केली गेली आहे. १२ एप्रिल २०१२ रोजी येथील लष्करी अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा सत्ता हातात घेतली व विद्यमान राष्ट्राध्यक्ष व उमेदवारांना कैद केले.
इतर बहुतांशी आफ्रिकन देशांप्रमाणे गिनी-बिसाउ गरीब व अविकसित आहे. मानवी विकास सूचक व दरडोई उत्पनामध्ये गिनी-बिसाउ जगात सर्वांत खालच्या क्रमांकांपैकी एक आहे. येथील राजकीय भाषा पोर्तुगीज असली तरीही केवळ १४ टक्के जनता पोर्तुगीज वापरते.
खेळ
- ऑलिंपिक खेळात गिनी-बिसाउ
- गिनी-बिसाउ फुटबॉल संघ
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)
- गिनी-बिसाउचे विकिमिडिया अॅटलास
- विकिव्हॉयेज वरील गिनी-बिसाउ पर्यटन गाईड (इंग्रजी)