गाव कावळा
गाव कावळा भारतीय कावळा | ||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
बंगळुरू मधील कावळा | ||||||||||||||
प्रजातींची उपलब्धता | ||||||||||||||
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||||||||
| ||||||||||||||
शास्त्रीय नाव | ||||||||||||||
Corvus splendens Vieillot, १८१७ | ||||||||||||||
गाव कावळा हा एक काळ्या रंगाचा काकाद्य कुळातील पक्षी आहे. याला मराठीत गाव कावळा, सोम कावळा, घर कावळा किंवा नुसते 'कावळा' म्हणतात. भारतीय कावळ्याचे मुख्य दोन प्रकार आहेत, गाव कावळा आणि डोमकावळा.
लहानपणापासूनच काऊच्या गोष्टी आपण ऐकलेल्या असतात. शहर गाव या सारख्या मनुष्य वस्तीच्या जवळ हमखास आढळणारा हा पक्षी. याला कारण म्हणजे त्याचे भक्ष्य. कावळा खात नाही असे क्वचितच कोणत खाद्य असेल. पाव, बिस्किट, मांस, दुसऱ्या पक्षांची अंडी आणि चक्क खरकटेसुद्धा. याचाच एक भाऊ म्हणजे डोमकावळा किंवा जंगली कावळा. काळा कुळकुळीत रंग पण आकार थोडा मोठा. जंगली कावळेसुधा हल्ली मनुष्य वस्तीजवळ दिसतात. कारण नष्ट होत चाललेली जंगले. जंगली कावळा पूर्णपणे काळा कुळकुळीत असतो तर सोमकावळ्याची मान राखाडी रंगाची असते एखाद्या उकिरड्यावर सोमकावळा खाद्य शोधीत असताना जर तेथे डोमकावळा टपकला, तर सोमकावळा बाजूला होतो . एक डोम कावळा चोचीत पुरी घेऊन उडत चालला होता तो एका घराच्या गच्चीला असलेल्या पाणी वाहून जाण्याच्या पाईपवर बसला. मग टुणूक टुणूक उड्या मारत तो पाईपच्या तोंडावर आला. खाली वाकला आणि चोचीतली पुरी पाईपमध्ये ठेवून पसार झाला. जेव्हा खायचे नसते तेव्हा आपल खाद्य लपवून ठेवायचे आणि गरज पडल्यावर शोधायचे ही अक्कल कावळ्याला असते. काड्याकाटक्यांचे अस्ताव्यस्त डिग म्हणजे कावळ्याचे घरटे. शहरामध्ये राहणारे कावळे अक्षरशःजी मिळेल ती वस्तू गोळा करून घरट्यात टाकतात. काचा नसलेली चष्म्याची फ्रेम लोखंडाच्या तारा, रिबिनी, काथ्या, दोऱ्या ....कावळ्याचे हे अजब घर तो एप्रिल ते जून दरम्यान आकारतो. कावळी कोकिळेच्या पिल्लांनासुद्धा सामावून घेते. कोकिळा स्वतःचे घरटे न बांधता कावळ्याच्या घरट्यात अंडी घालते.
संदर्भ
दोस्ती करू या पक्ष्याशी - (पुस्तक - लेखक : किरण पुरंदरे)